Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : संजय गांधी यांना खलनायक, तर राजीव गांधी यांना नायक म्हणून दाखवले; सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर भाजप खासदार दुबे यांची प्रतिक्रिया

Political Breaking Live Headlines Updates : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र पुस्तकावरून देशातील राजकीय क्षेत्रात पडसाद उमटत असताना, कोल्हापुरमध्ये 'गोकुळ'मध्ये महायुतीने मिळवलेल्या सत्तेनंतरही भीषण शांतता आहे. राज्य आणि देश पातळीवरील दिवसभरातील राजकीय घडामोडींचे वेगवान अपेडट...

सरकारनामा ब्युरो

Sonia Gandhi Memoir : संजय गांधी यांना खलनायक, तर राजीव गांधी यांना नायक म्हणून दाखवले; सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर भाजप खासदार दुबे यांची प्रतिक्रिया

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र पुस्तकावर प्रश्न उपस्थित केले आहे. "हे कसले रिलाँच आहे? सोनिया गांधी यांनी त्यांच्या पुस्तकात संजय गांधी यांना खलनायक, तर राजीव गांधी यांना नायक म्हणून दाखवले आहे. संजय गांधी, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यापैकी आज कोणीही हयात नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यांना उत्तर कोण देणार? त्यांनी जे लिहिले आहे, ते योग्य की अयोग्य, हे शेवटी कोण ठरवणार? जर सोनिया गांधी यांचा आणीबाणीला एवढा विरोध होता, तर 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी संजय गांधी यांना उमेदवारी का दिली? त्याऐवजी राजीव गांधी यांना उमेदवारी का दिली नाही? असे प्रश्न खासदार निशिकांत दुबे यांनी उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT