दुष्काळी पार्श्वभूमीवर भाऊबीजेच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील मुर्टी येथील सोनकरवस्तीवर जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांच्या घरात सर्वांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकर खाऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, विविध विभागांचे अधिकारी, संभाजी नाना होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजवर्धन शिंदे, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. एका तरुणाचा जीव गेला आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा राजकीय दबावातून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे!
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील मोडलगावमध्ये एकाच कुटंबातील आठ मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. शेताच्या बांधावर खेळताना नकळत एरंडीच्या बिया खाल्ल्याने आठ चिमुकल्यांना गंभीर अन्न विषबाधा झाली. विषबाधेत चार वर्षांच्या एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.