Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : अजितदादांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जाहीर करा : युगेंद्र पवार यांची मागणी

Political Breaking Live Headlines Updates : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्र पुस्तकावरून देशातील राजकीय क्षेत्रात पडसाद उमटत आहेत. राज्य आणि देश पातळीवरील दिवसभरातील राजकीय घडामोडींचे वेगवान अपेडट...

सरकारनामा ब्युरो

NCP SP Yugendra Pawar : अजितदादांच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जाहीर करा : युगेंद्र पवार यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील कारणे मान्य नसून, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासावर समाधानी नाही. या अपघाताच्या चौकशीचा अंतिम अहवाल लवकर जाहीर करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली.

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण! वेळ येईल तशा सर्व गोष्टी कळतील; सुनेत्रा पवार यांचे मोठे विधान

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. वेळ येईल तशा सर्व गोष्टी कळतील, असे सूचक संकेत सुनेत्रा पवार यांनी दिले. या विषयावर अधिक भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT