Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : महागाई दर 6.09 टक्क्यांवर, शेअर बाजारात घसरण; रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ होण्याची शक्यता

Political Breaking Live Headlines Updates : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन टॅप प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. यासह राज्य आणि देशतील दिवसभरातील राजकीय घडामोडींचे वेगवान अपेडट...

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महागाई दर 6.09 टक्क्यांवर, शेअर बाजारात घसरण; रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ होण्याची शक्यता

ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर 6.09 टक्क्यांवर पोहोचल्याने रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने शुक्रवारी शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी यांची सलग तीन दिवसांची तेजी थांबली. 30 समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स 318.56 अंकांनी (0.39 टक्के) घसरून 81,592.45 अंकांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान त्यात 622.26 अंकांची घसरण झाली होती. 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी 155.05 अंकांनी (0.61 टक्के) घसरून 34144.30 अंकांवर बंद झाला.

Amit Shah Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी आणि सोमवारी (ता. 15 व 16) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या आवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱ्याला महत्त्व आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT