अमरावतीच्या मोर्शी नगरपरिषद इमारतीच्या छतावर अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांची मटण पार्टी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता या प्रकरणी भाजप आमदार उमेश यावलकर सह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते याचं अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने तसेच उपाध्यक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मटण पार्टीवरून मोर्शी नगरपरिषदमध्ये भाजप आणि शिवसेना वाद पेटण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी येथील अदानी समूहाच्या पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे वनविभागाच्या तपासणीत समोर आले आहे. यानंतर वनविभागाने प्रकल्पाचे सर्व कामकाज तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले असून संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.