अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होतं असल्याचं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. अजितदादा असताना घड्याळ एक मिनिट मागे पुढे होतं नव्हते आता घड्याळ थोड मागे पुढे होत असले तरी घड्याळ व्यवस्थित आहे, असं वक्तव्य झिरवाळ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
बारामती एमआयडीसी परिसरातील बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या गाडीवर शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. छातीत त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.