Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Political Update :'सीजेपी'चे सौरभ दास यांना लंडनला जाण्यापासून रोखले

Political Breaking Live Headlines Updates : सीजेपी'चे सौरभ दास यांना लंडनला जाण्यापासून रोखले, सर्वोच्च न्यायालयात पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी करणारी याचिका यासह महत्त्वाच्या घडामोडी

सरकारनामा ब्यूरो

अतिक्रमण हटाव मोहीम सुरुच राहणार - नवल किशोर राम

शहरातील अतिक्रमणांवरून सभागृहात प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्याच वर्तुळात आता महापालिकेच्या कारवाईचा बुलडोजर पोहोचला आहे. राजकीय दबाव आणि 'फोनाफोनी'ला न जुमानता प्रशासनाने सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही हातोडा चालवला आहे. ही अतिक्रमण हटाव मोहीम केवळ तात्पुरती नसून, ती थेट मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याचा कडक इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.

नगरसेविकेच्या अनधिकृत कार्यालयावर पुणे महापालिका 'मेहरबान'

शहरात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका लावला असताना दुसरीकडे नगरसेविकेच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाला मात्र अभय मिळाल्याचे चित्र आहे. सोसायटीच्या सामायिक ॲमेनिटी स्पेसमध्ये उभारलेल्या या कार्यालयाविरोधात वारंवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाने कारवाई केलेली नाही.

उलट हे बांधकाम सोसायटीनेच काढावे आणि त्याचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, असे पत्र सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना पाठवून महापालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे.

दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी, लक्षातठेवलंय २०२९ - सतेज पाटील

दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी ? असा प्रश्न करत लक्षात ठेवलंय 2029 , असा इशारा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिला आहे.

'सीजेपी'चे सौरभ दास यांना लंडनला जाण्यापासून रोखले

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी आपल्याला दिल्ली विमानतळावर रोखण्यात आरोप केला आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी लंडनला जाण्यापासून अडवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या विषयी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT