उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतीसंगम येथे जात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. तर याचवेळी खासदार सुप्रिया सुळे देखील कराडमधील प्रीतीसंगम येथे अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या.
धाराशिवमधील एका क्रायक्रमात बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 2024 च्या निवडणुकीत मी 3 लाख 29 हजार 846 मतांच्या फरकाने निवडून आले होते. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आपण 3 लाख 46 हजार 847 मतांच्या फरकाने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय तुमची कामं केली असतील तरंच तुम्ही मला मतदान करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आज आमदार झिशान सिद्धकी स्वीकारणार. नियुक्ती पत्र दिल्यानंतर तब्बल २८ दिवसांनंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.