Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

Political Breaking Live Headlines Updates : मंत्री गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. यासह आजच्या दिवसभरातील राजकीय अपडेट्स जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

नाशिकच्या ४ भाविकांचा अपघातात जयपुरला मृत्यू

राजस्थानमधील जयपूर येथे नाशिक जिल्ह्यातील अजमेर सौंदाणे तालुका सटाणा येथील भाविकांच्या वाहनाला पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत.

अवघ्या १० हजारांचं कर्ज शेतकऱ्याच्या जीवावर बेतलं, हत्या की आत्महत्या?

नांदेडमधील मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांनी मागील महिन्यात एका खासगी फायनान्स कंपनीकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर दुष्काळामुळे हतबल झालेल्या शिंदे यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. त्यामुळे वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपनीच्या लोकांनी गुरुवारी चंद्रकांत शिंदे यांना थेट गावातून उचलून आपल्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह चिखलवाडी रस्त्यावरील खालसा फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आणि ती फायनान्स कंपनीच्या लोकांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कोअर कमिटीची बैठक आज मुंबईतील वाय.बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न; अंबादास दानवेंची टीका

मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न आहेत. महाजनांचे नातेवाईक बोगस ऑर्डरमध्ये पकडले असून महाजन सत्तेचे फळ चाखण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

कर्जमधील वृक्षतोड थांबवावी, पर्यावरणप्रेमींची मागणी

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित एका कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी वनक्षेत्र परिसरात हजारो झाडांची वृक्षतोड होत आहे. 13 हजार 500 कोटी रुपयांचा एकूण खर्च या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. मात्र, जंगल परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीमुळं पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारनं याबाबतचा विचार करावा आणि वृक्षतोड थांबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT