Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : सुनील तटकेंच्या विरोधात शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार

Political Breaking Live Headlines Updates : मल्लिकार्जून खर्गे यांच्या विरोधात भाजप आक्रमक, देशभर आंदोलन करणार, कर्जतचा प्रकल्प पर्यावरणपुरकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर, यासह देश आणि राज्यभरातील घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही : दिलीप वळसे पाटील

कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याशी थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. वृक्षतोडीच्या घटनेचा संदर्भ देताना भौगोलिक परिस्थितीची अचूक माहिती घेणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे भीमाशंकर अभयारण्याची प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असं वकतव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

पुण्यात सर्वांसमोर तरूणीच्या अपहरणाचा प्रयत्न

पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात एक व्यक्ती १८ वर्षीय तरुणीची छेड काढून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव जितू किशोरीलाल सरोज असे असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. शनिवारी सायंकाळी समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला आरोपीने अयोग्य ठिकाणी स्पर्श केला. त्यानंतर त्याने तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सुनील तटकेंच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांच्या तक्रारी

कोकणातील शिवसेनेचे नेते, आमदार आणि मंत्र्यांकडून सुनील तटकरेंविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्यात आली आहे. “सुनील तटकरेंना तुम्हीच आवरा,” अशी नेते आणि मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना विनवणी.

निलेश पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जळगाव जिल्ह्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीसांची खर्गेंवर टीका,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की , खर्गेजी ही चांगली गोष्ट झाली की, आवेशात येऊन तुम्ही सार्वजनिक मंचावरून अशी भाषा वापरली, जी सहसा केवळ काँग्रेस पक्षाच्या बंद दारांआडच ऐकायला मिळते. आता देशाला कळून चुकले आहे की काँग्रेस पक्ष नक्की काय आहे.

मोदी-जींच्या दिवंगत वडिलांबद्दल वापरलेली असभ्य भाषा काँग्रेस पक्षाच्या निर्लज्जपणाची पराकाष्ठा दर्शवते.मी पुन्हा सांगतो: पुढची निवडणूकही तुम्हीच हरणार आहात. याचे एक कारण नक्कीच मोदी-जींबद्दल लोकांच्या मनात असलेली आपुलकी हे असेल, परंतु तुमच्या स्वतःच्या द्वेषपूर्ण शब्दांमुळेही तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल.

मल्लिकार्जून खर्गेंच्या विरोधात भाजप आक्रमक, देशभर आंदोलन करणार

एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. खर्गे यांच्या विरोधात देशभर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT