Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : मतदारसंघ फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले जाणार

Political Breaking Live Headlines Updates : लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयक ३० डिसेंबर रोजी लोकसभेत तर, २ डिसेंबर रोजी राज्यसभेत मांडले जाणार असून त्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

खासदार कल्याण काळे यांचा पंचायत समितीसमोर ठिय्या

शासनाच्या रोजगार हमी योजनेवर विश्वास ठेवून शेतात विहिरी, शेततळी, गोठे आणि फळबागांची कामे पूर्ण केली; मात्र चार वर्षांपासून हक्काची देयकेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. २०२२ ते २०२६ या कालावधीत मनरेगाअंतर्गत पूर्ण झालेल्या वैयक्तिक लाभाच्या कामांची कुशल घटकाची देयके अद्याप थकीत आहेत. या देयकांच्या मागणीसह दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करावीत, यासाठी शुक्रवारी (ता. २७) खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोफत लढा; माजी सरन्यायाधीशांचं आवाहन

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच गरज पडल्यास मोफत कायदेशीर सेवा द्या, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकिलांना केले.

मतदारसंघ फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले जाणार

लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे विधेयक ३० डिसेंबर रोजी लोकसभेत तर, २ डिसेंबर रोजी राज्यसभेत मांडले जाणार असून त्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT