पाच जागांच्या निकालानंतर तरी ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का?एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो याचा विचार करणार आहोत का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महायुती जिंकली असती मात्र मित्रपक्षाच्या हव्यासापोटी, तिसऱ्या जागेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जे निर्णय घेतात त्यांच्यामुळे महायुतीला फटका बसला. सचिन सानप यांना जी 10 ते 12 हजार मतं मिळाली ती पदवीधरला देखील मिळू शकली असती. मात्र, शिवसेनेच्या पाठींब्यामुळे ती मतं फिरली आणि पुणे पदवीधरमध्ये फटका बसला, असे मत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्यक्त करत पदवीधरच्या पराभवाचे खापर शिंदेंच्या शिवसेनेवर फोडले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या राजकीय रणांगणात डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी बाजी मारत महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना धक्का दिला. तब्बल १८ हजार १२४ मतांच्या फरकाने विजय मिळवत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रतापसिंह पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. तब्बल ४५ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर गुरुवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी पाटील यांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान केले.
अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकी शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे ७ हजार १७ मतं घेत पराभूत झाले . पराभव झाल्यावर देशपांडे म्हणाले, शिक्षकांची कीव करावीशी वाटते, पैठणी अन् पैशांवर शिक्षकांनी मतदान केलं. जशी लायकी तसा त्यांना प्रतिनिधी मिळतो, असे म्हणत देशपांडे यांनी शिक्षकांची लायकी काढली.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावलीये. म्हस्केंनी विरोधी पक्षातील नेत्यांना आव्हान दिला होता जर ठाण्यात येऊन एकनाथ शिंदेंवर टीका केली तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. ठाण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नरेश म्हस्केंना नोटीस दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.