Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : कृष्णेच्या पाण्यावरून राजकारण तापलं, संजय पाटलांनी मंत्री शंभूराज देसाईंवर साधला निशाणा

Political Breaking Live Headlines Updates : सांगलीत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत माजी खासदार संजयकाका पाटलांनी कृष्णा नदीचे पाणी अडवण्यावरून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर संताप व्यक्त केला, यासह राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर आता  AI ची नजर

रस्त्यावर कचरा टाकणं रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कचरा टाकण्याच्या ठिकाणी एआय आधारित कॅमेरे बसवण्यात येणार असून, पहिला प्रयोग माहीम येथील गजानन वाटिका परिसरात करण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांद्वारे कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची हालचाल टिपली जाणार असून, ध्वनिक्षेपकाद्वारे तात्काळ स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवणे आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या प्रयोगाचा उद्देश असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यात दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द

पुण्यात दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द पुणेकरांची पाण्यावर गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी पुणेकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळणार आहे.

एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. नऊ परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांना १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदने व पुरावे सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

कृष्णेच्या पाण्यावरून राजकारण तापलं, संजय पाटलांनी मंत्री शंभूराज देसाईंवर साधला निशाणा

सांगलीत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत माजी खासदार संजयकाका पाटलांचा रौद्ररूप पाहायला मिळाला, कृष्णा नदीचे पाणी अडवण्यावरून संजयकाका पाटलांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर संताप व्यक्त केला. संजयकाका पाटलांनी भर बैठकीमध्ये कृष्णा नदीचा पाणी अडवल्याच्या कारणातून संताप व्यक्त करत पाणी अडवणारे हे कोण ? असा निशाणा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर साधला.

आशा स्वयंसेविकांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस देण्याचे महापौर रितू तावडेंचे निर्देश

बीएमसी अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT