Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : रोहित पठारे प्रकरणात 3 आरोपी अटकेत

Political Breaking Live Headlines Updates : देशभरात दिवाळीचा उत्साहात, आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय फटाके फुटत आहेत. मतदार याद्यांची विशेष सखोल कार्यक्रमात मतदार यादीतून वगळलेल्यांना पुन्हा एका संधी देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासह देश आणि राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

रोहित पठारे प्रकरणात 3 आरोपी अटकेत

वैजापूरमध्ये जुन्या वादातून रोहित पठारे नावाच्या तरुणाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. पाणी मागितल्यावर त्याच्या तोंडावर लघवी केल्याचा संतापजनक आरोप कुटुंबीयांनी केलाय. पालकमंत्री संजय शिरसाटांनी आज कुटुंबीयांची भेट घेत पोलिसांच्या तपासावरील प्रश्नचिन्हामुळे तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवलाय. या प्रकरणी 3 आरोपींना अटक झालीय. तसंच कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.

राजू शेट्टींचा मोर्चा आता सोलापूरकडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा इशारा दिलाय. सोलापूरमधील कारखान्यांनी केवळ 3100 रुपयांचा दर जाहीर केलाय. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरलाय. उद्या पंढरपुरात राजू शेट्टी आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.

आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी

ॲग्रीस्टॅक अंतर्गत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याबाबत महसूल विभागाने नवीन परिपत्रक जारी केलंय. जमिनीची नोंद किंवा लागवड माहिती उपलब्ध नसल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित होते. आता शेतकऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांच्या अभिलेख पडताळणीनंतर सहज फार्मर आयडी मिळणार आहे.

फटाक्यांच्या आवाजाने मुक्या जीवांना इजा होऊ नये; नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम!

दिवाळी सणाच्या काळात फटाक्यांची आतषबाजी, मोठ्या आवाजाचे फटाके आणि इतर कारणांमुळे पशुधन तसेच भटक्या प्राण्यांना इजा होण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी नाशिक जिल्ह्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये आपत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जखमी अथवा आजारी प्राण्यांना तातडीने पशुवैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची कारवाई; चार आस्थापना सील

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत, निलंबित परवाने असूनही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन तेल रिपॅकिंग युनिट्स आणि दोन मिठाई व फराळ उत्पादकांना सील ठोकले आहे. दिवाळीत नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.

आई-बहिणीवर तलवारीने हल्ला करून तरुणीचे अपहरण


धारशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने राहत्या घरी जाऊन आई आणि बहिणीवर तलवारीने हल्ला करत प्रेयसीचे अपहरण केले. अर्टिगा गाडीतून तरुणीला पळवून नेताना समोर येणाऱ्यांनाही उडवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दोन दिवसापूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांना घरी सोडण्यात आले.

मेहता प्रकाशनाचे सर्वेसर्वा अनिल मेहता यांचे निधन

सोलापुरात भाजप-काँग्रेस नेत्यांमधील वादाचे रूपांतर गुन्ह्यांत; आतापर्यंत ३ गुन्हे दाखल

सोलापुरातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांमधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत याप्रकरणी एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या समर्थकांवर दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांवर विना परवानगी आंदोलन करत बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिक खबरदारी घेत आहेत.

Yavatmal Shivsena UBT : सरकार शेतकऱ्यांचे कैवारी असेल तर शेतकऱ्यांना 50 हजारांची मदत द्या; आमदार संजय देरकर

सरकारला लाज वाटायला पाहिजे की, पाच हजार रुपयात काय होतं, तुमचा ड्रायव्हर सुद्धा पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करू शकत नाही, आणि आपण शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करायला निघालात. हे कितपत योग्य आहे? ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांचा अपमान आहे. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत सरकारने द्यायला हवी होती. सरकार शेतकऱ्याचं कैवारी असेल तर शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत दिली, तर आम्ही समजू सरकार खरच शेतकऱ्यांचा कैवारी आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार संजय देरकर यांनी केली आहे.

Latur DCC Bank : जिल्हा बँक निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका; नाव न घेता सहकार मंत्र्यांची विरोधकांवर टीका

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापल असून, आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार पॅनलच्या प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'अज्ञान म्हणजे काय?' हे सांगत त्यांनी नाव न घेता थेट आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना लक्ष्य केले. अज्ञानात माणूस कसा खुश असतो, त्याचं उदाहरण देत त्यांनी जोरदार निशाणा साधला.

Thane Crime News : ⁠कुप्रसिद्ध फरार झारखंड नक्षलवाद्याला ठाणे ATSकडून अटक; दहा लाखांचे होते बक्षीस

दिवाळी सणांत ठाणे ATSची मोठी कामगिरी करत, ⁠कुप्रसिद्ध फरार झारखंड नक्षलवाद्याला अटक केली आहे. ⁠झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर तब्बल १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. ⁠ऐन दिवाळीत हा नक्षलवादी घातपातासाठी आला होता का? याचा तपास ⁠ATSने सुरू केला आहे. ⁠डोंबिवली जवळील ठाकुर्ली परिसरातून या नक्षलवाद्याला अटक केली आहे. संजय सरोज यादव उर्फ संजय गोधरे उर्फ बुधारामची असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

Solapur BJP-Congress Politics : सोलापुरातील भाजप-काँग्रेस नेत्यामधील वादाच्या प्रकरणात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल

सोलापुरातील भाजप-काँग्रेस नेत्यांमधील वादात भाजप आमदार देवेंद्र कोठे समर्थकांवर 2, तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात 1 गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. विना परवानगी आंदोलन करत बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद झाली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, तिरुपती परकीपंडला यांच्यासह 13 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला आणि शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे कार्यकर्ते निरंजन बोद्धूल यांना धमकी दिल्या प्रकरणी आमदार देवेंद्र कोठे समर्थकवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पवन खांडेकर, आकाश मुदगल, ओम धुत्तरगावकर, नागेश म्हेत्रे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांकडून कारवाई; चौघांना अटक

जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. भुसावळ तालुका पोलिसांनी किन्ही एमआयडीसी परिसरात शुक्रवारी पहाटे छापा टाकून सुमारे 2 लाख 48 हजार 840 रुपये किमतीचे 62.21 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली असून, दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले.

Nagpur Crime : ‘उमेद मेडिकल कार्ड’ अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्याने निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तब्बल 32 लाखांना फसवले

रेल्वे अधिकारी असल्याची बतावणी करून ‘उमेद मेडिकल कार्ड’ अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्याने 60 वर्षीय निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल 32 लाख 82 हजार 150 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 31 ऑक्टोबरला ते निवृत्त झाले. त्यानंतर 2 नोव्हेंबरला सकाळी त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला.

Jalgaon Crime Update : शेतातच गांजाची लागवड करून त्याची चोरटी विक्री; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव शेतातच गांजाची लागवड करून त्याची चोरटी विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतमालकावर जामनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. मालदाभाडी (ता. जामनेर) येथे छाप्यात पोलिसांनी गांजाची 13 किलो 430 ग्रॅम वजनाची झाडे मुळांसह जप्त केली. त्याची किंमत 3 लाख 35 हजार 750 रुपये आहे. अनिल दगडू पाटीलविरुद्ध (रा. मालदाभाडी) गुन्हा दाखल झाला आहे.

Mumbai News Update : ऐन दिवाळीत नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्य रेल्वेचे रविवारी ‘मेगाब्लॉक’चे नियोजन

ऐन दिवाळीत नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्य रेल्वेने रविवारी ‘मेगाब्लॉक’चे नियोजन केल्याने मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान दाेन्ही दिशांकडील मार्गिकांवर दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Creamy Layer : इतर मागारवर्गीयांसाठी क्रिमीलेअरचे निकष कायम; सर्वोच्च न्यायालयाचा मुदतवाढीस नकार

इतर मागासवर्गीय उमेदवारांचा क्रिमीलेअर ठरवताना पालकांचे वेतन किंवा उत्पन्नासोबत त्यांचे पद आणि त्याचा दर्जा विचारात घ्यावाच लागतो, या आपल्या आठ महिन्यांपूर्वीच्या आदेशाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनरूच्चार केला. तसेच हे निकष लागू करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची केंद्र सरकारची मागणी फेटाळून लावली. मार्चमध्ये लागलेल्या केंद्रीय प्रशासकीय परीक्षांतील सेवावाटपाला हा निकष लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT