पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता. मुंबई विमानतळावर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत सामील झालेले हे सर्व कार्यकर्ते इंडिगोचे कर्मचारी आहेत.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज नाशिकमध्ये भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जिथे शक्य तिथे महायुती म्हणून निवडणूक लढवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. तशी शिफारफ पुणे पोलिसांना केली होती. त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. पण योगेश कदम यांनी शिफारस केली असली तरी पोलिसांनी सचिन घायवळला परवाना दिलेला नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादावर पडदा टाकला आहे.
या सरकारने OBC मध्ये फुट पाडली आणि आता मज्जा मारतय असा हल्लाबोल ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासकीय निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी नागपुरात सकल ओबीसी संघटनेकडून महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासकीय निर्णय रद्द करावा अशी मागणी केली.
जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेजुएलाच्या मारिया कोरिना माचाडो यांना जाहीर झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी दावा केला होता पण त्यांचं स्वप्न भंगलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीला सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत भाजपची निवडणुकांची रणनिती ठरणार आहे.
''लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, तर आम्हाला निवडून यायचं, त्यामुळे आम्ही आश्वासन देत सुटतो,' असं वादग्रस्त विधान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं . दरम्यान त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर छावा संघटना आक्रमक झाली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची हकलपट्टी करावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून सहकार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी छावा संघटनेनं केली आहे.
बंजारा आणि धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करू नये ही मागणी करत आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता इथं मोर्चा काढण्यात आला. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक झालेला असताना दुसरीकडे आदिवासी बांधवही इतर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करू नये यासाठी आक्रमक झाले आहेत. राहाता शहरातून तहसील कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी महिला, पुरूष सहभागी झालेत.
सिंहगड लॉ कॉलेजच्या मनमानी कारभार विरोधामध्ये विद्यार्थिनी दिव्या शिंदे हिनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत सिंहगड लॉ कॉलेज प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. सिंहगड लॉ कॉलेज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहे. तसेच पाचव्या राऊंडच्या आधीच्या चौथ्या राऊंडमध्ये कॉलेज प्रशासनाने मॅनेजमेंटच्या सीट कोटा भरला आणि पात्र विद्यार्थ्यांकडे डोनेशनची मागणी केली, असा आरोप विद्यार्थिनी दिव्या शिंदे यांनी केला आहे.
हिंगोली इथला शेतकरी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर संतापला आहे. तहसील कार्यालयासमोर येत राज्य सरकारच्या नावानं पैशाची उधळण करत आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यानं यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या या अनोखं आंदोलन चर्चेत आलं आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस असून, अमरावती जिल्ह्यातील आंदोलन आक्रमक झाले आहे. या संपामध्ये महावितरणचे तब्बल 1 हजार 231 अधिकारी कर्मचारी सहभागी यात 285 अभियंते सहभागी झाले आहे. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही वीज कंपनीत सुरू असलेल्या खासगीकरण विरोधात वीज कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. यात नांदेड जिल्ह्याचा उल्लेख नाही. राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्याचे झाले असताना मदत नाकारली म्हणून नांदेडच्या मुखेड तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांनी सरकार आदेशाची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष पॅकेज मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करावा, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
बुलढाणा इथल्या मलकापूरहून एका 16 वर्षीय युवतीचं अपहरण झाले आणि तिला घेऊन जाणारी कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली. दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून ही कार पुढे सुसाट निघाली होती. पण टायर फुटल्याने गाडी अपघातग्रस्त झाली. विशेष म्हणजे, मुलीला वाचविण्यासाठी कारचा पाठलाग दुसरी गाडी करत होती. अपहरण करणारे तीन जण पोलिसांनी पकडले असून, त्यातील दोघं अल्पवयीन आहेत. मुलगी बेशुद्ध असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.
अहिल्यानगर शहरातील गुन्हेगारी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. आता शहरातील मुन्सिपल कॉलनीत आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुचाक्यांना आग लागली. आगीत पाच दुचाक्यांचं मोठं नुकसान झालं. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, आग कोणी लावली का याचा तपास केला जात आहे.
'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय', असे वादग्रस्त विधान करणारे अजित पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अवघ्या काही वेळातच आपल्या विधानावर माघार घेत माफी मागितली आहे. 'ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल, तर शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळावं, अर्बन बँक आणि पतसंस्थांनी देखील शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, आणि याच योजना कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, हा बोलण्याचा माझा उद्देश होता. मात्र कुणाचं मन दुखवलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
Babasaheb Patil: अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना कृषिमंत्रीपदही गमवावं लागलं. आता राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका विधानानं विरोधकांना सत्ताधा-यांना कोडीत पकडण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे. बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय," असं म्हणत त्यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळलंय. निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासने द्यावी लागतात असंही त्यांनी म्हटलंय.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकी धाक दाखवत लाखो रुपये आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाच दरोडेखोर असल्याची माहिती संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगावमधील महामार्ग क्रमांक सहावर रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे.
पंजाबमधील चंदीगडमध्ये साताऱ्यातील जवानाचा कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. शहीद जवान यांचे पार्थिव विमानाने आज पहाटे पुण्यात दाखल झाले. रूग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह कराडला आणला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ अभियानांतर्गत राजीव गांधी नगर, राजगड चाळ परिसर आणि बिबवेवाडीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीगाठी घेतल्या. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांशी पवार यांनी संवाद साधला.
मुळशीतील धरणग्रस्त भागातील मतदार यादीतून तब्बल ९८८ मतदारांची नावे गायब झाली आहेत. या प्रकरणी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय नाव द्यावे यावर कारस्थाने सुरू आहेत. अदाणी यांचे मत कोणतेच नाव देऊ नये, म्हणजे अदाणी एयरपोर्ट म्हणून ते ओळखले जाईल, नरेंद्र मोदी यांचे नाव विमानतळास द्यावे अशीही त्यांची इच्छा दिसते. तसेच स्व.दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाचा विरोध दिसतोय!, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवत राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छटपूजेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावली आढावा बैठक बोलवली आहे.
पुण्यात शरद पवार गटाचे वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार आमदार बापू पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये आमदार पठारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला .आमदार पठारे यांच्या विरोधात बंडू खांदवे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बंड खांदवे आणि आमदार पठारेंमध्ये धक्काबुक्की झाली होती.
महावितरणच्या खासगीकरणा विरोधात कामगार संघटना संपावर गेल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर रात्रंदिवस सज्ज राहणार, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सरकारने मेस्मा कायदा लावला तरी कामगार संपावर ठाम आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.