Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : काही ठिकाणी भाजप बाजूला असेल, शिंदे -अजित पवारांची युती होईल : छगन भुजबळ

Marathi latest Politics live news updates : आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहीण भावाला अटक, बदलापूरमध्ये अजित पवार-फडणवीसांमध्ये युती, शिंदेंना डावलले तसेच ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र येणार, आज निघाणार महामोर्चा यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

दिंडोरी तालुक्यातील गट-गण आरक्षण जाहीर 

जिल्हा परिषद गट

खेडगाव - अनुसूचित जमाती महिला

कसबे वणी - अनुसूचित जमाती

कोचरगाव - अनुसूचित जमाती

अहिवंत वाडी - अनुसूचित जमाती

उमराळे बु. - अनुसूचित जमाती

मोहाडी - अनुसूचित जमाती

पंचायत समिती गण

टिटवे - अनुसूचित जमाती महिला

अहिवंत वाडी - अनुसूचित जमाती महिला

कसबे वणी - अनुसूचित जमाती

लखमापूर - अनुसूचित जाती

कोचरगाव - अनुसूचित जमाती महिला

नळवाड पाडा - अनुसूचित जमाती

उमराळे बु. - अनुसूचित जमाती महिला

ननाशी - अनुसूचित जमाती

खेडगाव - ओबीसी महिला

मातेरेवाडी - ओबीसी महिला

मोहाडी - सर्वसाधारण

पालखेड बंधारा - ओबीसी

काही ठिकाणी भाजप बाजूला असेल, शिंदे -अजित पवारांची युती होईल -भुजबळ 

भुजबळ नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले की,

मी वर्तमानपत्रातून वाचले. महायुतीमधील तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही.तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे - अजित पवार यांची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप व अजित पवार युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते. स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते

Sanjay Raut : संजय राऊतांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट

संजय राऊत यांच्या तब्येत अचानक बिघडली आहे. भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी अॅडमिट करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती आहे.

Ravindra Dhangekar : रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप; समीर पाटील चंद्रकात दादांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्याच्या तयारीत

भाजप माझ्यावरच टिकेचा भडिमार करत आहे. गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी कुणी माझ्याशी बोलत नाही. पोलीस म्हणाले की, तुमच्यावर गुन्हे दाखल करायची तयारी झाली आहे. रविंद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले समीर पाटील चंद्रकात दादांच्या मार्फत माझ्यावर मोक्का लावण्यासाठी पोलिसांसोबत तयारी करतोय.

आर. आर आबांच्या आमदार मुलावर येणार प्रदेशाध्यक्ष पदाची नवी जबाबदारी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल घडत आहेत. या संदर्भात मुंबईत बैठक होत असून या बैठकीत सांगलीच्या युवा आमदारांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे मोठी जबाबदारी सोपवणार असल्याची माहिती समोर येत आहे

काँग्रेस मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढण्याच्या तयारीत?

स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईक बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.

IRCTC घोटाळा प्रकरणात लालू, राबड़ी देवी, तेजस्वीला मोठा झटका!

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबड़ी देवी व विधानसभेतील विरोधी नेते तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टाने आईआरसीटीसी घोटाळा व ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला. त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर संकटात मोठी वाढ झाली आहे.

व्हीलचेअरवर कोर्टात हजर झाले लालू प्रसाद यादव; आयआरसीटीसी घोटाळा आणि ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणातील चार्जशीटवर आज निर्णय

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव व्हीलचेअरवर कोर्टात हजर झाले. आयआरसीटीसी घोटाळा आणि ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणातील आरोपपत्रावर आज निर्णय होणार आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yavatmal Medical Update : सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू; कफ सिरप औषधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला

यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी इथं 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्यानंतर मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेताना प्रकृती बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर मृत्यू झाला. मेडिकलच्या औषधांची तपासणी केली जात आहे. मध्यप्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कफ सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून, तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

NCP Politics : राष्ट्रवादीकडून धाराशिव जिल्हा संपर्कमंत्रीपदी कृषीमंत्री दत्ता भरणे यांची नियुक्ती

राज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

Raj Thackeray MNS : राज ठाकरेंनी शिवतीर्थावर आज पदाधिकाऱ्यांची बोलावली महत्त्वाची बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी, प्रवक्ते आणि नेत्यांची आज बैठक शिवतीर्थावर बोलावली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाशी युतीवर राज ठाकरे काय भाष्य करतात, यावर आता चर्चा रंगली आहे.

Amravati Politics : भाजपच्या बॅनरबाजीत आमदार रवी राणा यांचा फोटो झळकला

अमरावतीमध्ये भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा बैठक घेणार आहे. यानिमित्ताने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजपचे शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांनी लावलेल्या बॅनरवर युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते तथा आमदार रवी राणा यांचे फोटो झळकले आहेत. भाजपच्या बॅनरवर रवी राणांचा फोटो असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Sindhudurg Crocodiles : सावंतवाडी वेत्ये गावात 12 फुटी मगरीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं पकडलं

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वेत्ये गावातील कलेश्वर मंदिरलगत असलेल्या ओढ्यात तब्बल 12 फुट लांब महाकाय मगरीला पकडण्यात आलं. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या मगरीला पकडलं. वनविभाग या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची पुढील कार्यवाही करणार आहे.

Supriya Sule : संपूर्ण कर्जमाफीशिवाय स्वस्थ बसणार नाही; सुप्रिया सुळे यांचा इशारा

'महायुतीने निवडणूक काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची हमी दिली होती. अतिवृष्टीमुळे शेतकरी आता संकटात आहे. आशावेळी कर्जमाफीची गरज आहे. ती घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये जागा वाटप

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) काल रविवारी जागा वाटप केले. विधानसभेच्या 243 जागांपैकी भारतीय जनता पक्ष व संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागा लढणार आहेत. लोकजनशक्ती पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आहेत. संयुक्त जनता दल पहिल्यादांच भाजपपेक्षा जास्त लढवणार आहे.

Gopichand Padalkar : अहमदनगर लिहिलेल्या दुकानांचे परवाना रद्द करा; गोपीचंद पडळकर यांची मागणी

अहमदनगरचे आता अहिल्यानगर नामांतर झाले आहे. मात्र अद्याप अनेक ठिकाणी अहमदनगरच्या पाट्या दुकानांवर दिसत आहे. अशा दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई महापालिकेने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.

Raj Thackeray And Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यात सहावी भेट; राजकीय खलबतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जावून रविवारी सहकुटुंब स्नेहभोजन केले. या दोघांमध्ये यानिमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे समजते. गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंची ही सहावी भेट आहे.

बदलापूरमध्ये अजित पवार -देवेंद्र फडणवीस यांची युती

अंबरनाथ-बदलापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे. मात्र, या युतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्थान देण्यात आलेले नाही. अंबरनाथ-बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे एकनाथ शिंदे येथे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT