Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live updates : महापालिका निवडणुकीत माजी सैनिकांना एक जागा मिळावी; आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

Marathi latest Politics live news updates : आज 14 ऑक्टोबर रोजी राज्यसह देशभरात घडणाऱ्या विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Ahilyanagar Politics : महापालिका निवडणुकीत माजी सैनिकांना एक जागा मिळावी; आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आमदार संग्राम जगताप यांना भेटून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये माजी सैनिकांना एक जागा मिळावी, ही मागणी केली. आमदार जगताप यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी जयहिंद सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक शिवाजी पालवे, कार्याध्यक्ष शिवाजी गर्जे आदींसह माजी सैनिक उपस्थित होते.

Sangali NCP Politics : सरसकट कर्जमाफीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीचे सांगली इथं चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावे, यासह मागणीसाठी सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तातडीने कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचनामे करत, शेतकऱ्यांची वसुली थांबवावी, या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा दिला.

RPI Politics : आठवलेंची आंबेडकरांना साथ; दीपक केदार यांचं रोखठोक मत

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना ट्विट करून युतीची साथ घातली होती, यावर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी टीका केली आहे. 'रिपब्लिकन ऐक्य हे कधीच होणार नाही. कुणी कुणासोबत जायचं नाही, आधीच ठरलेल आहे,' असे दीपक केदार यांनी म्हटले आहे.

खेड तालुक्यातील आरक्षण जाहीर, भोसरीच्या आजी-माजी आमदारांच्या महिला एकमेकांविरोधात लढणार

पुणे जिल्हा परिषदेकडून खेड तालुक्यातील आरक्षण जाहीर होताच, भोसरीच्या आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील महिलांना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या कन्या विनया सुधीर मुंगसे आणि सध्याचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा महेश लांडगे या दोघीही खेड तालुक्यातील कुरुळी जिल्हा परिषद गटातून एकमेकांविरोधात लढणार असल्याचं चित्र आहे.

उद्धव ठाकरेंसह आघाडीचे अनेक नेते शिवालय येथे दाखल

महाविकास आघाडीतील नेते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी शिवालय येथे एकत्र जमा झाले आहेत. उद्धव ठाकरेंसह, जयंत पाटी, , अजित नवले आदी नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले आहे.

भुजबळांनी घेतली चोक्कलिंगम यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्य निवडणूक आयोग चोक्कलिंगम यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजू शकले नाही. महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.

Solapur live: सोलापूर महापालिका 10 प्रभागांमध्ये फेरफार

सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 26 प्रभाग निश्चित करण्यात आले आहे. एकूण 102 नगरसेवकांची निवडून येणार आहे. 24 प्रभागांमधून 4 नगरसेवक,इतर 2 प्रभागांमधून 3 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप रचनेवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात आली आहे. 8 हरकती मान्य करण्यात आल्या असून 10 प्रभागांमध्ये फेरफार करण्यात आले आहे.

Eknath shinde: एकनाथ शिंदे  आजपासून दोन दिवस सातारा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी येणार आहेत. शिंदे हे उद्या साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक देखील होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी त्याचा दरे गावी मुक्कामी जाणार आहेत.

BJP News: अकोल्यात वंचितला मोठा धक्का, बबलू जगताप भाजपमध्ये

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे महापालिकेत 2012 आणि 2017 असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेश झाला.

निलेश घायवळला रोहित पवारांनीच पासपोर्ट मिळवून दिला - राम शिंदे

कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीच मविआच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला, असा खळबळजनक आरोप विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केला आहे.

CM फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, शिंदे सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय रद्द

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या जीवन बिमा मार्ग येथे 909 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेपैकी 200 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून उर्वरीत जवळपास 700 चौरस फूटांटी जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता ती जागा देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला आहे.

तलाठ्यांना आठवड्यातील 4 दिवस कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक

राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक आहे. नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत, तसेच सरकारच्या योजना पोहोचण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Anjali Damania : मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे - अंजली दमानिया 

समाजसेविका अंजली दमानिया यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणाबाबत केलेल्या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांना कृषीमंत्री होण्याचा सल्ला दिला आहे. अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. ह्यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास / ज्ञान असणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंड हा देश ४१२८५ चौ किमी आहे आणि महाराष्ट्र ३०७७१३ चौ किमी आहे. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत ८ पट मोठे आहे. स्वित्झर्लंड ची GDP ८३,३३,००० कोटी आहे आणि महाराष्ट्राची ४२,६७,००० कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता ९,३२,००० कोटी आहे. ते कसे कमी होणार ? काही ब्लू प्रिंट आहे का? असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Pune Crime : गुंड नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल

कुख्यात गुंड नीलेश घायवळने जबरदस्तीने एका व्यक्तीच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर मोबाईल सिमकार्ड घेतले. तसेच, वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात घायवळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT