Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political updates : हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का;जिल्हाध्यक्षानं दिला राजीनामा

Marathi latest Politics live news updates : आज महाविकास आघाडीतील काही नेते पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यासह 15 ऑक्टोबर रोजीट्या देशासह राज्यभरातील सर्व राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकरानामा ब्युरो

हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का;जिल्हाध्यक्षानं दिला राजीनामा 

हिंगोली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. ते अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

महायुती सरकारचा आणखी एक महत्त्वाचा जीआर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांचे काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. यानंतर सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31 हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली, पण ती कधी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता सरकारने एक महत्त्वाचा जीआर काढत 480 कोटी रुपयांच्या वाटपास मंजुरी दिली आहे.

Ekanth shinde : महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झालीय

महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झालीय. विधानसभेत झालेल्या पराभव पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यामुळेच, निवडणुका पुढे ढकला, अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीकडून केलं जात आहे. सगळे एकत्र आल्यामुळे जिंकण्याची खात्री विरोधकांना पटली पाहिजे होती. मात्र, जिंकण्याची खात्री नसल्यामुळे महायुती जिंकणार असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे, त्यामुळेच अशी मागणी केल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले..

Nitish kumar : विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर होत आहेत. भाजपने 243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांसाठी 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर, नितीशकुमार यांच्या जदयु पक्षाने 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, 27 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून 11 उमेदवार हे गत 2020 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांनाही नव्याने तिकीट देण्यात आलं आहे. जदयुच्या पहिल्या उमेदवार यादीत एकही मुस्लिम चेहरा मैदानात उतरवरण्यात आला नसल्याचेही दिसून येत आहे.

अमरावती जिल्ह्यात हजारो तक्रारींचा पाऊस

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील 19 गावे मतदार यादीतून गायब असल्याचे समोर आले आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी तक्रार केल आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांना निवडणुकीत उभे राहायचे असल्याने त्यांनी मतदार यादी तपासली असता मतदार यादीतून मतदारांची नावे नव्हे तर अख्खे 19 गावेच गायब असल्याचे पुढे आले आहे. आमच्या या भागातील मतदान विरोधी पक्षाला मिळत असल्यामुळे जाणीवपूर्वक गावाची नावे गायब केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.

धक्कादायक! अमरावतीत 19 गावं मतदार यादीतून गायब

मतदार याद्यातील घोळामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार टीका करणे सुरू केलं आहे. याचदरम्यान अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील 19 गावे मतदार यादीतून गायब असल्याचे समोर आले आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तशी तक्रार केल आहे. माजी सभापती शशिकांत मंगळे यांना निवडणुकीत उभे राहायचे असल्याने त्यांनी मतदार यादी तपासली असता मतदार यादीतून मतदारांची नावे नव्हे तर अख्खी 19 गावेच गायब निदर्शनास आले आहे.

मुंबई एसटी बँकेत तुफान हाणामारी, सदावर्ते, शिंदेसेना संचालक भिडले

मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून ही हाणामारी गुणारत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संचालकांमध्ये झाली. या घटनेमुळे बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अश्लील वर्तणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप या वादाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांचा विदेश दौरा योजनेत मोठा बदल, आता 2 लाख रुपये अनुदान; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती


राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांचा विदेश दौरा योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. राज्य शासनाने या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या अनुदानात दुप्पट वाढ केली असून आता अनुदानाची रक्कम 1 लाख इतकी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

बिबट माणुस यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी अजित पवार मैदानात

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव शिरुर खेड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे बिबट माणुस यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. तो रोखण्यासाठी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. याबैठकीला दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित आहेत. या बैठकीतुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत थेट निर्णय घेतला जाणार का हे पहावे लागणार आहे.

‘आमची बदनामी करू नका, नाहीतर दिवाळीनंतर राजकीय फटाके वाजवतो,’ दादांच्या शिलेदाराचा माजी मंत्री बाळा बेगडे यांच्यावर हल्लाबोल

मावळमधील वडगाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता रॅलीत आमदार सुनिल शेळके यांनी माजी मंत्री बाळा बेगडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ‘आमची बदनामी करू नका, नाहीतर दिवाळीनंतर राजकीय फटाके वाजवतो,’ असा इशारा दिला आहे. तसेच शेळके यांनी बेगडे यांच्यावर सरकारी निधीचा गैरवापर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवाराला विरोध करण्याचा आरोप केला.

कमी दर दिल्यास 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

जिल्ह्यातील काही साखर कारखाने तुलनेने चांगला दर देत आहेत, तर काही कारखाने अगदी कमी दर देतात. यामुळे येणाऱ्या काळात ऊस दरावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. योग्य दर न दिल्यास 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतूक बंद करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे

'कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललो नाही, मात्र...' : आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथे जन आक्रोश मोर्चामध्ये भाषण केले होते. त्यांनी त्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर गदारोळ माजला. यानंतर आज त्यांनी सांगितले की, हिंदुत्व म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल द्वेष नाही ती एक संस्कृती आहे. दीपावली सण हा हिंदू सण असला तरी सर्वच समाजाचे लोक त्यामध्ये फटाकडे उडवतात. त्याचप्रमाणे संक्रांतही करतात. पण आम्ही कधीही कुठेही बोललो नाही की फटाकडे फोडू नयेत. पतंग उडू नयेत. आम्हाला कोणत्या समाजाचा द्वेष आहे किंवा आम्हाला अडचण आहे असे कुठेही नाही. मात्र जे काही व्यक्ती जे त्रास देतात त्यांच्यावर बोलण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मी कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोललेलो नाही. आम्ही कोणाचा द्वेष करत असेही त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदी उद्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत, जिथे ते १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. ते कुर्नूल येथे सुपर जीएसटी सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमात देखील सहभागी होतील.

आयपीएस पुरण कुमार यांचे आज अंत्यसंस्कार

हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांचे अंत्यसंस्कार आज केले जातील. दिवंगत वाय. पुरण कुमार यांचे अंत्यसंस्कार आज दुपारी 4 वाजता चंदीगडमध्ये होणार आहे.

सोलापूरला रोज पाणी मिळावं यासाठी आमचा प्रयत्न - फडणवीस

सोलापूरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, सोलापूरात आयटी पार्क उभारणार आहे. त्यामुळे जिल्हाच्या विकासासाठी हवाई सेवा महत्त्वाचा.

राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; जयंत पाटील म्हणतात – सर्व्हर दुसराच ऑपरेट करतोय

मतदार यांद्यावरून गोंधळ आणि बोगस मतदानाच्या चर्चा सुरू असताना, विरोध पक्षातील नेत्यांनी आज निवडणूक अधिकारी व आयुक्तांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

राजकीय पक्षांना मतदार याद्या न दाखवून काय मिळतेय?

मागील काही वर्षापासून स्थानिक निवडणूक झाल्या नाहीत,मतदार याद्या सुधारण्यासाठी अजून ६ महिने घेतले ते काय होईल? उद्या आयोग काय निर्णय घेतात हे पाहू आणि आम्ही विरोधक आमचा निर्णय घेऊ तुम्हाला सांगू-राज ठाकरे

यामागे कोण आहे?

चॅनेलवर बातम्या प्रसारित झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाइट वरून मतदारांची माहिती हटवण्यात आली, याबाबत आयोगालाच माहिती नाही, जर यांनाच माहिती नसेल तर आयोगाच्या वेबसाईटवर नक्की कोण काम करताय ? यामागे कोण आहे?-राज ठाकरे

MVA Press Conference live : उद्धव ठाकरे

मतदार याद्यांतील घोळ कमी करा

सत्ताधाऱ्यांच्या सत्तेच्या चौरवाटा आम्ही शोधल्या

राज ठाकरे

मतदार याद्यांत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका

मतदार याद्या न दाखवून मिळवून काय मिळतंय

पाच वर्ष निवडणुका लांबल्या , आता सहा महिने लांबल्या तर काय फरक पडणार?

सर्व पक्षाचे एकमत होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक याद्या जाहीर करु नका

-बाळासाहेब थोरात 

नाशिक, पु्ण्यात एकाच घरात ८०० हून अधिक मतदार

मतदार यादीतील घोळ राज्य आयोगाला दाखवला

मतदार यादीत बाहेरील लोक फेरफार करतात

अनेक ठिकाणी दुबार मतदार-जयंत पाटील 

निवडणूक आयोगाला आम्ही पुरावे दिले. अनेक ठिकाणी दुबार मतदार होते. हे आम्ही आयोगाला लक्षात आणून दिले-जयंत पाटील

लवकरच विरोधी पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद

राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र आणि विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक संपली आहे. आता लवकरच पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. सर्व नेते यशवंत चव्हाण सेंटरमध्ये दाखल होत आहेत. पत्रकार परिषदेपूर्वी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.

Pune Court Live: न्याय मिळत नसल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचे पाऊल

पुणे जिल्हा न्यायालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारत आयुष्य संपवलं. न्यायालयात आज सुनावणी होती. न्याय मिळत नसल्यामुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी सांगितले की, नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोलापूर-मुंबई विमानसेवेला आजपासून सुरूवात

सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू विमानसेवेला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानसेवेचं उद्घाटन होणार आहे. तब्बल 16 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही विमान सेवा सुरुवात होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

तुमचा संतोष देशमुख करू, महेश डोंगरेंना धमकी

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांना धमकी देण्यात आली. फोन करत तुमचा संतोष देशमुख करू अशी धमकी देण्यात आली.

विरोधकांचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटले

मविआ आणि मनसेचे शिष्टमंडळ मंगळवारी निवडणूक आयोगाला भेटले होते. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती. आज पुन्हा शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले असून शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू आहे, या बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत.

सनातन धर्म अस्पृश्यता पाळतो, जीव घेतो - प्रकाश आंबेडकर

हरियाणातील आयपीएस अधिकारी पुरन कुमार यांनी जातीभेदातून त्रस्त होऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “सनातन धर्म = अस्पृश्यता. सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये डॉ. पायल तडवी, डॉ. रोहित वेमुला, आयपीएस अधिकारी पुरन कुमार आणि नांदेड मधील हत्या झालेले अक्षय भालेराव यांचे फोटो शेअर केले आहेत.

रवी नाईक यांना फडणवीसांनी दिली श्रद्धांजली

गोव्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान मंत्री रवी नाईक जी यांचे निधन झाले, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, कृषिमंत्री अशा विविध भूमिकांमधून त्यांनी गोव्याच्या जनतेची सेवा केली. अनेक दशकांची त्यांची कारकीर्द गोवेकरांना कायम स्मरणात राहील. निवडणूक प्रमुख म्हणून गोव्यात काम करताना, किंवा अनेक निवडणुकांमध्ये प्रचारासाठी गेलो तेव्हा, त्यांच्याशी सातत्याने संवाद व्हायचा, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पालघरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भगदाड

पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र लखू माच्छी तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख हसमुख धोडी आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Pune BJP : पुण्यात भाजपमध्ये इन्कमिंग

भाजपमध्ये इन्कमिंग होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने विविध पक्षातील मुख्य पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा मेगा प्रवेश सोहळा होणार आहे. पुढील काही दिवसांत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

Nashik Crime : आरपीआय नेते प्रकाश लोंढेच्या गँगला नाशिकमध्ये निर्माण करायची होती संघटीत गुन्हेगारी

आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात भुयारात दोन खोल्या आणि आलिशान व्यवस्था होती. तर मुंबईसारखी संघटित टोळी बनवून नाशिकमध्ये गुन्हेगारीचे नेटवर्क निर्माण करण्याचा या गँगचा कट होता. त्यात भूषण लोंढे हा मुख्य भूमिका बजावत होता. आरपीआयच्या माध्यमातून त्याने आपले नेटवर्क चांगलेच वाढवले होते अशी माहितीही पोलिसांना हाती लागली आहे.

'या' जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

शरद पवार आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीत

जेष्ठ नेते शरद पवार आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पुण्याला जाणार असल्यामुळे ते शिष्टमंडळासोबत जाणार नाहीत.

शिवसेना मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आबा लांडे यांची निवड

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेने भाकरी फिरवली असून मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आबा लांडे यांची निवड केली आहे.

Former Goa CM Ravi Naik Passes Away : गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक यांचं निधन

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी सीताराम नाईक यांचं वयाच्या 79 व्या वर्षी मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. फोंडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.15) ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता खडपाबांध येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महापालिका निवडणुकीची अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला जाहीर होणार

महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 6 नोव्हेंबरला प्रारूप तर 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Ajit Pawar : पहाटेपासून अजित पवारांचा पुणे दौरा सुरू

आज सकाळी सात पासून अजित पवार यांनी पुण्यातील विकासकामांची पाहणी सुरू केली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या तानपुरा पुलाची पाहणी त्यांनी केली. पुलाची पाहणी करून अजित दादा पिंपरी चिंचवडकडे रवाना होणार आहेत.

Mahavikas Aghadi : विरोधकांचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार

महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार आहे. काल जेष्ठ नेते शरद पवार, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह आमदार जयंत पाटील, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधक निवडणूक आयोगाला भेटणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT