काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यंदा दिवाळी अनोख्या पद्घतीने साजरी केली..त्यांनी दिल्लीतील मिठाईच्या दुकानाला भेट देत लाडू आणि इमरती बनवण्याचा आनंद लुटला.
पुण्यातील शनिवारवाड्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे दाखल झाल्या. यावेळी रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. त्यांनी मेधा कुलकर्णींवर जोरदार टीका केली. दरम्यान, आमचा संघर्ष भाजपशी नाही. शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही. हिरव्या रंगाचा भाजपला एवढा राग का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी देहूत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.शेतकरी कर्जमाफीची त्यांची मागणी आहे. सरकारमधील मंत्री, आमदार यांच्या घरात दिवाळीचा लखलखाट असला तरी दारात दिवा लावण्याचीही शेतकऱ्याची परिस्थिती नाही, त्यामुळं त्याचं घर आज काळोखात आहे असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला सरकारवर केला.
पुण्यातील जैन बोर्डिंंगच्या जमीन खरेदीवरून पुण्यात राजकीय धुमशान सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर माजी आमदार रविकांत धंगेकर यांनी या जमीन व्यवहारप्रकरणी गंभीर आरोप केले होते. दरम्यान, जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी तातडीने सुनावणी घेऊन स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २८ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील याचिका सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या प्रकरणात आयोगाने आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्या आहेत का, याची शहनिशा करणारी याचिका न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आहे. या धनुष्यबाणाच्या संदर्भातील सुनावणी १२ नोव्हेंबरपासून रोजी सूर्यकांत यांच्यासमोर होणार आहे. या सुनावणीसाठी १२, १३ आणि १४ नोव्हेंबरपासून असे राखीव ठेवण्यात येतील, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले आहे, असे ॲड असीम सरोदे यांनी सांगितले.
जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा आहे, त्यामुळे तो त्यांना परत मिळावा, अशी आमची मागणी आहे. त्यांनी तो परत न केल्यास संघर्ष अटळ आहे. आम्ही या कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
बीडच्या वडवणीत पैशाचं आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. तब्बल शंभर जणांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. वडवणी शहरातील एका सभागृहात हा प्रकार सुरू होता. काही महिला आणि पुरुषांना खिश्च्रन धर्मात येण्यासाठी पैशाचे आमिष दाखवल जात होतं, अशी तक्रार पोलिसांकडे आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. संपूर्ण चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वडवणी पोलिसांनी दिली.
धर्मांतर बंदी लवकरच आणला जाणार आहे. ह्या घटना आम्हाला थांबवयाच्या आहेत, हेच आमच्या सरकारचं काम आहे, असे राज्याचे कॅनिबेट मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
खासदार मेधा कुलकर्णी ह्या अशिक्षित आणि बुरसटलेल्या विचारसरणीच्या आहेत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. मेधा कुलकर्णी यांच्या नौटंकीमुळे पुणे शहरात हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होतोय. पुण्याचा समाजिक सलोख बिघडतोय, त्यामुळे खासदार कुलकर्णी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.
भाजपच्या नेत्या आणि महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती संगीता गायकवाड यांनी आज शिवबंधन बांधले. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का आहे.
नाशिकच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आज मातोश्रीवर दाखल झाल्या असून, पक्षप्रवेश सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकच्या शिवसेनेला बळ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस विक्रांतवरील कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. सोमवारी आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, यावर्षी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील नौदल कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी.
दिवाळीच्या सणात सांगलीकरांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालून जाब विचारला आहे.
नागपूर येथील विविध समस्या घेऊन काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. महापालिका आवारात आंदोलक धुसले आहे. शहरात साचलेल्या कचऱ्यावरुन आंदोलक आक्रमक झाले आहेत. आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे.
ठाण्यात दिवाळी पहाट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या डोळ्यात सध्या अश्रू आहे, शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार हे आश्वासन आम्ही पाळले, असे शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नौदलाच्या जवानासोबत दिवाळी साजरी करीत आहे. मोदींनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुमच्या माध्यमातून मी कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करीत आहे, असे मोदी म्हणाले.
खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने राज्यात मोहीम राबविण्यात आली येत आहे. आतापर्यंत भेसळयुक्त पदार्थाचा तब्बल दोन कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत १ कोटी ९७लाख ९३ हजार ४२ रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे.
pune : शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात आंदोलन केले. यामुळे परिसरात काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज येथे पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचे सांगितले.
पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोरेगाव पूर्व प्रभाग क्रमांक ५२ मधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आज सकाळी ११ वाजता पी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयावर 'बादली मोर्चा' काढण्यात येणार आहे. साईबाबा कॉम्प्लेक्स, नवभारत, ओबेरॉय वूड परिसरात अधिक दाबाने पुरवठा सुरू झाला आहे. मात्र कन्यापाडा, बंगाली कंपाउंड, आरे मधील युनिट ७, ३१ व ३२ या आदिवासी पाड्यांत पाणीप्रश्न कायम आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी राज्यात 96 लाख खोटे मतदार असल्याचा दावा केला आहे. ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार आहे असं म्हटलं आहे तर त्यांनी पुरावा द्यायला हवा. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे, अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी त्यामध्ये चुकीचं काही असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल.'
बीडच्या वडवणी येथे काही जणांच्या धर्मांतरासाठी प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौघांची चौकशी सुरू केली आहे. वडवणी येथे मागील काही दिवसांपासून धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची शिवसेनेच्या नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी संघटन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांदेंकडे ही नवीन जबाबदारी सोपवली आहे.
बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासलेला काल मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूर येथून अटक केली. गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणी अटक असलेल्या आरोपींंनी कासलेबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कासलेला अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.