Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : ऊस दर आंदोलनामुळे ऐन दिवाळीत ST चे नियोजन कोलमडलं : कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द

Political Breaking Today Live Headlines Updates : ऊसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाला ४० तास उलटून गेले आहेत, यासह आजच्या राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

सहकारसम्राटांसाठी दुष्काळ ठरला 'वरदान'

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार, असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील विद्यमान संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खासदारकी लढवलेला राज ठाकरेंचा जवळचा नेता काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, २००९ मध्ये मनसेच्या उमेदवारीवर पुणे लोकसभा निवडणूक लढविलेल्या शिरोळे यांनी आता काँग्रेसचा हात धरल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ऊस दर आंदोलनामुळे ऐन दिवाळीत परिवहन विभागाचे नियोजन कोलमडलं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनामुळे ऐन दिवाळीत परिवहन विभागाचे नियोजन कोलमडलं असून आंदोलकांनी महामार्ग बंद केल्यामुळे कोल्हापूरहून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या 166 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाचा फटका परिवहन विभागाला बसला आहे.

राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठीचं आंदोलन सुरूच

ऊसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाला ४० तास उलटून गेले आहेत. आंदोलकांनी पुणे बंगळूरु महामार्ग अडवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT