Manoj Jarange News  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics LIVE Upates : - परळी पोलिसात जरांगे पाटील यांच्याविरोधात 'एनसी'दाखल

Maharashtra Politics Breaking News Top Headline LIVE Updates : स्थानिक, राज्य, देशातील महत्त्वाच्या राजकीय, प्रशासकीय बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

परळी पोलिसात जरांगे पाटील यांच्याविरोधात 'एनसी'दाखल

परभणी येथील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे थेट नाव घेत टीका केली होती. त्यांना राज्यात फिरू देणार नाही, अशा इशारा दिला होता. त्यानंतर आज परळी शहर पोलिस स्टेशनसमोर धनंजय मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे पाटील हे जातीयवाद करत असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले होते.

सुरेश धस यांनी दादांवर साधला निशाणा, मिटकरांनी दिलं प्रत्युत्तर

संतोष देशमुख हत्येप्रकरणात परभणीत काढलेल्या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले. दादा क्या हुवा तेरा वादा, असा टोलाही धस यांनी लगावला. आत्ता यावरून महायुतीमध्ये वातावरण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आहे

विखे - शिंदेंची एकमेकांवर स्तुती सुमने, थोरातांना टोमणे

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली आहेत.. एकमेकांची स्तुती करताना दोघांनीही नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना मात्र टोमणे लगावले आहेत..

सूर्यवंशी कुटुंबीयांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

परभणी प्रकरणात शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी आज यशवंत भवन, अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या तपास प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार सूर्यवंशी कुटुंबियांनी केली.

वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली

पोलिस अधिकारी गणेश मुंडे याने पोलिसांच्या एका व्हाॅट्सअप ग्रुपवर 'तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही', असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकली होती. या वादग्रस्त पोस्टनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे याची पुणे शहरातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

देशाच्या जडणघडणीत ब्राम्हण समाजाचा वाटा - माधव भंडारी

देशाच्या स्वातंत्र्यात चळवळीत तसेच समाज सुधारण्याच्या चळवळीत बहुतांश ठिकाणी ब्राम्हण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. भारताच्या जडणघडणीमध्ये ब्राम्हण समाजाचा वाटा दुर्लक्षीत करण्यासारखा नाही, असे माधव भंडारी म्हणाले.

narhari zirwal : ...तर राज्यही चालवू शकतो - नरहरी झिरवळ

मी प्रचारात सांगत होतो आदिवासी आहे म्हणून मला आदिवासी मंत्रिपद देऊ नये. मी तर गमतीने म्हणतो की 288 आमदारांचे सभागृह मी संभाळले तर राज्यही संभाळू शकतो, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

सुरेश धस यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडेल - अमोल मिटकरी

परभणीतील मोर्चामध्ये अजित पवारांचे नाव घेत क्या हुआ देता वादा, असे विचारणाऱ्या सुरेश धसांवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. सुरेश धस यांच्यामुळे महायुतीत मिठाचे खडा पडेल असे मिटकरी म्हणाले आहेत.

Rupali Chakanakar News : चाकणकर यांनी ट्वीट करत सुरेश धस यांच्यावर साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. चाकणकर यांनी ट्वीट करत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल रूपाली चाकणकर यांनी केला. तुम्ही न्यायाच्या बाजूने आवाज उठवत आहात पण त्यामध्ये तुमचा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जर सुरेश धस यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते, असा सवाल त्यांनी केला आहे.

Eknath Khadse News : खडसेंची गिरीश महाजनांवर जहरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली. गिरीश महाजन यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी, घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या भूमीला गुंडाचा अड्डा बनवले : बजरंग सोनवणे

केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीना फासावर लटकवा, या गुन्ह्यातील मास्टर माइंडला त्वरित अटक करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली.

Santosh Deshmukh Murder Case : गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी : सुरेश धस

बीड सरपंच हत्येच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रकरणात आका असो व कोणी असो अटक करावी. 'गॅंगस ऑफ परळी'मुळे पुण्याचे नाव बदनाम होत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.

Santosh Deshmukh Murder Case....अन्‌ मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील मोर्चा अर्धवट सोडला

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे, या मागणीसाठी बीड, परभणीनंतर पुण्यामध्ये आज मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबतच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. मात्र त्यांना एक फोन आला आणि जरांगे पाटील यांना हा मोर्चा अर्धवट सोडून जावे लागले आहे.

पुण्यातून झाला होता बेपत्ता

आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये सापडला आहे. गुट्टे यांचा नातू पुण्यातून बेपत्ता झाला होता. आज सकाळी मनमाड बसस्थानकात तो सापडला आहे. सुमीत गुट्टे असे आमदार गुट्टे यांच्या नातवाचे नाव आहे. मनमाड पोलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान सुमीत गुट्टे याच्या घरचे लोकही त्याला घेण्यासाठी मनमाडकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

Santosh Deshmukh Murder Case : पुण्यातील जन आक्रोश मोर्चात सुरेश धस, ज्योती मेटे सहभागी

संतोष देशमुख खूनप्रकरणी आज पुण्यात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या मोर्चात आमदार सुरेश धस, शिवसंग्रामच्या ज्योती मेटेही सहभागी झाल्या आहेत. देशमुख खूनप्रकरणी आतापर्यंत बीड, परभणी येथेही आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज पुण्यात हा निषेध आक्रोश मोर्चा निघालेला आहे.

Shivsena UBT : उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना पुन्हा धक्का; सहसंपर्कप्रमुख पक्ष सोडणार

विधानसभा निवडणुकीपासून बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. धुळ्याचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. हिलाल माळी हे आपल्या समर्थकांसह ठाण्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे. हिलाल माळी हे पक्षसंघटनेत सक्रीय काम करणारे शिवसैनिक होते, त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याने धुळ्यात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.

Maharashtra Politics LIVE Upates : बीडमधील चार पोलिस अधिकाऱ्यांची बदली

संतोष देशमुख खून प्रकरण राज्यात गाजत असून राजकीय पातळीवरून त्यावर सर्वांचे लक्ष आहे. बीडच्या पोलिसांवर या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्हा प्रशानातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Anjali Damania : धनंजय मुंडे, पंकजा मुंडे वंजारी समाजाचा वापर करून घेतायेत - दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून आपला मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप रविवारी (ता. ५) केला आहे. तसेच त्यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि रश्मी शुक्लांची वेळ मागितल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर केला जात असून नरेंद्र सांगळे नावाच्या व्यक्तीकडून सतत धमकी मिळत असल्याचे म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : अन्यथा आंदोलनाचे लोन राज्यभर उभारू, मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी (ता.4) रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा दिला होता. आज त्यांनी, देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना पाठिशी घालू नये असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपण त्यांच्या मागे नसल्याचे दाखवून द्यावे. तसेच न केल्यास आंदोलनाचे लोन राज्यभर उभारू असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच त्यांनी यावेळी या हत्येतील आरोपी पुण्यातच कसे सापडतात असा सवाल केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case : 'हे' असले अधिकारी तपास करणार का? राष्ट्रवादीच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

या SIT मधील एका अधिकाऱ्याने निवडणूक कालावधीत धनंजय मुंडेचा कार्यकर्त्याप्रमाणे काम केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच त्यांनी या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यावर शंका उपस्थित करणारा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा SIT टीमवरच अक्षेप

एक्सवर ट्विट करत SIT निष्पक्ष चौकशी करणार? सवाल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडबरोबर SIT मधील एका अधिकाऱ्याचा फोटो सोशल मिडियावर ट्विट केला आहे.

OBC  News : मोर्चाला प्रति मोर्चानं उत्तर देणार: सानप

ओबीसी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसात भेट घेणार आहेत. वंजारी समाजाला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी सांगितले. जरांगे यांचे वक्तव्य म्हणजे पारावरच वक्तव्य नाही, त्याची दखल समस्त ओबीसी समाज घेईल, आणि मोर्चाला प्रति मोर्चा आणि उत्तर दिलं जाईल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

Satosh Deshmukh Murder Case: बीड प्रकरणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या (ता. ६) सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनं यांची भेट घेणार आहे. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्था प्रकरणी शिष्टमंडळ राज्यपालांना पत्र देणार आहेत.

Laxman Hake ON Manoj Jarange: हाकेंचे जरांगेंना थेट आव्हान

ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एका मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी खुले आव्हान दिले आहे. हाके यांनी जरांगे पाटलांवर पुन्हा निशाणा साधला आहे. घरात घुसून मारु, असे विधान जरांगे यांनी केले आहे, त्यावर लक्ष्मण हाके बोलत होते. 'तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायंच सांगा,'असे सांगा असे थेट आव्हान हाके यांनी जरांगे यांना दिले. "दोन समाजात अराजकता निर्माण होईल, असे विधान जरांगे यांनी करु नये," असे हाके यांनी सांगितले.

Raj Thackeray Meeting: राज ठाकरे घेणार विभाग अध्यक्षाची बैठक

आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या सर्वच पक्ष तयारी लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी मंगळवारी (ता. ७) मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलवली आहे. यामध्ये मुंबईतील 36 विधानसभा मनसे अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis Live News : CM फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 7 उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील सात उड्डाणपुलाचे लोकार्पण करणार आहेत. नागपूरतील गोधनी रेल्वे स्थानक, वर्धात सिंदी रेल्वे स्थानक, अमरावतीतील चांदुर रेल्वे स्थानक, चंद्रपुरातील बाबुल पेठ फाटक, धुळे येथील दोंडाई शहरातील रेल्वे फाटक, जळगाव येथील स्थानिक आणि वाशिम रेल्वे स्थानकाजवळ अशा सात उड्डाणपुलाचे लोकार्पण ते आज करणार आहेत.

Mumbai Crime News : घाटकोपरमधून 13 बांगलादेशींना अटक

मुंबईच्या घाटकोपरमधून पोलिसांनी 13 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व 13 आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसानी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती. यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैबूर अजगर शेख, आलम अजगर शेख, मिजानू सलाम शेख, अब्दुल सिराज शेख,मुराद मिजानूर शेख, रत्ना तैबुर शेख,अमीना मुराद शेख,सबिना अब्दुला शेख, कोहिनूर मिजानूर शेख यांच्यासह चार अल्पवयीन मुले अशा 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताची सीमा ओलांडून पश्चिम बंगालमार्गे भारतात आले आहेत.

koyna dam earthquake : कोयना धरण परीसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना धरण परीसरात सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. 2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. धरणाच्या पूर्वेकडील परीसरात हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

Santosh Deshmukh Case Live News : मराठा समाजाकडून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीती येथील पोलिस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार

लाल महाल येथून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT