MLC Election Result Live Updates  Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election Result Live Updates : पुणे पदवीधरमधून मविआच्या उमेदवार हर्षदा देशमुख आघाडीवर

MAHARASHTRA MLC ELECTION RESULTS 2026 : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार, याबाबतच्या सर्व अपडेट्स जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या मतमोजणीत दुसऱ्या पसंतीचा कोटा निश्चित झाला‌ आहे.

कोटा 88 हजार 558 ठरवला आहे.

एकुण वैध मते - 177115

अवैध मते - 16540

प्रतापसिंह पाटील - 73931

सतीश चव्हाण - 60768

रविराज साबळे - 19835

प्रतापसिंह पाटील 13163 मताने आघाडीवर

राज ठाकरेंचा स्थानिकांशी संवाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे साय डोंगराची पाहणी केली आहे. त्यानंतर ते आता या डोंगराच्या आसपास राहणाऱ्या स्थानिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी ते स्थानिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत.

राज ठाकरे साय डोंगर परिसरात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे साय डोंगर परिसरात दाखल झाले असून ते या परिसरातील वृक्षतोडीची पाहणी करणार आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्याअंतिम निकालासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी आघाडी कायम राखली आहे. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला २५ हजार ७५६ मतांचा कोटा अद्याप कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आमदारकीचा फैसला आता दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून असून, अंतिम निकालासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आघाडीवर

पुणे पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख पहिल्या पसंतीच्या मतांत आघाडीवर आहेत. तर भाजपच्या स्मिता जाधव दुसऱ्या स्थानी आहेत. पुणे पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली आहेत. विजयासाठी १ लाख १३११३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेसह राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुका लांबणीवर

कोल्हापूर जिल्हा बँकेसह राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील हजार वर संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT