Maharashtra Assembly Monsoon Session sarkarnama
महाराष्ट्र

Video Ajit Pawar : मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात! 'लाडकी बहीण योजने'तून महिन्याला मिळणार दीड हजार रुपये

Maharashtra Monsoon Session 2024 Ajit Pawar : अजित पवारांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून दर महा दीड हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली.

Roshan More

Maharashtra Monsoon Session 2024 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी असलेल्या योजनांचा पाढा वाचत अजित पवारांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून दरमहा दीड हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. वय वर्ष 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. जुलै 2024 पासूनही ही योजना लागू केली जाणार आहे.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, शिक्षण, राजकारणात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. महिलांना समान हक्का प्राप्त होण्यासाठी योजना प्रभावित राबवण्यात येतील. लेक लडकी योजना, जननी सुरक्षा योजना, ग्रामीण महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना, महिलांच्या नावे घर खरेदीत मुद्रांक शुल्कात सवलत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना अशा विविध महिलांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

विधानसभेसाठी 'साखर पेरणी'

भाजपने BJP लाडकी बहिण योजना प्रभावीपणे मध्य प्रदेश राबवली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशीच योजना विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात देखील घोषित केली जाईल, अशी शक्यता होती. त्या प्रमाणे आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली.

लाडका भाऊ योजना आणा...

अर्थसंकल्पीय अधिवेशना आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी लाडकी बहिण योजना घोषित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आमचे म्हणणे आहे की केवळ लाडकी बहिण नाही तर लाडका भाऊ ही योजना देखील आणा. त्यांना देखील आर्थिक लाभ द्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT