मनसेच्या मोर्चाची परवानगी पोलिसांनी का नाकारली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोर्चाला परवानगी न देण्याबाबत पोलिस आयुक्तांनी विचारले. मनसेने मोर्चासाठी मीरा भाईंदर हाच मार्ग निवडला, त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली, असे फडणवीस म्हणाले.
मनसेकडून आज मीरा भाईंदर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी मनसैनिकांची अडवणूक केली आहे. अनेकांना ताब्यात घेतले आहे. मोर्चाच्या मार्गावर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.
हिंजवडी, माण-मारुंजी या भागातील ‘राजीव गांधी इन्फोटेक पार्क’ आणि परिसरात रस्ते, पाणी, वीज यांसह इतर पायाभूत सुविधांच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या भागासह जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकुम आणि लगतच्या जलद शहरीकरण होत असलेल्या भागांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करावी, असे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. यामुळे एकात्मिक नियोजन, निधी व्यवस्था आणि सेवा पुरवठा यासाठी स्वायत्तता सुनिश्चित होईल. परिणामी नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल, असे सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
अमराठी व्यापाऱ्यांनी नुकताच मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते, याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मनसेने आक्रमक झाली आहे. मनसेकडून आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली आहे. अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे यांना मीरा भाईंदरमध्ये येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
मोर्चा निघणार म्हणजे निघणार, असे मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी अविनाश जाधव यांना अटक केल्यानंतर सांगितले. गुजराथी व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी कशी मिळाली, असा संतप्त सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. आम्ही दडपशाही खपवून घेणार नाही, असे देशपांडे म्हणाले. मराठी विरुद्ध अमराठी दंगली घडविण्याचा भाजपचा कट आहे,असा आरोप देशपांडे यांनी केला.
Bharat Bandh: सरकारचे कामगार, शेतकरी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी उद्या (ता. 9 जुलै) रोजी संप पुकारला आहे. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, महामार्ग, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रात काम करणारे 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत.
अमरावती शहरात बॉम्ब ठेवण्याचा फोन आल्याने पोलिसांनी चांगलीच धावपळ झाली. ही अफवा असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या नंबर वरून फोन आला तो नंबर आता बंद असून त्या व्यक्तीचा शोध अमरावती शहर पोलीस घेत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.