Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' मिळवण्यासाठी राज्यस्तरीय जनआंदोलनाची हाक

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आज एकटेच मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघणार तसेच दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून दाखल गुन्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...

सरकारनामा ब्युरो

Pune: मदन बाफना यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार थोड्याच वेळात पोहचणार

माजी मंत्री मदन बाफना यांचे काल निधन झाले. त्यांचा पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे बाफना यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात पोहचणार आहेत.

Amravati News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' मिळवण्यासाठी राज्यस्तरीय जनआंदोलनाची हाक; 28 सप्टेंबरला अमरावतीत महारॅली!

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आता गुरुदेव भक्त आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आगामी काळात राज्यस्तरीय तीव्र जनआंदोलन उभारण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असून, येत्या 28 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

Sangamner Drugs Crime : काशिफ कुरेशीला MD ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले; संगमनेर पोलिसांविरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

संगमनेर येथील काशिफ कुरेशी या तरुणाला MD ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी असद कुरेशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तौसीफ कुरेशी, गुलाम कुरेशी आणि इम्रान सौदागर यांच्याशी काशिफचा पूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने काशिफला बसस्थानक परिसरात चहासाठी बोलावण्यात आले.

Ahilyanagar Agri Update : कृषी अधिकाऱ्यांनी परत केले लॅपटॉप; आकृतिबंध रद्दचे आंदोलन पेटणार

कृषी विभागासाठी तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधाविरुद्ध कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. हा आकृतिबंध रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील सहाशेहून अधिक कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप जमा केले असल्याने विभागातील ऑनलाइन कामांवर त्याचा परिणाम होत आहे.

Heroin Drugs : पाच कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त; दोन कथित तस्करांना अटक

मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी अमली पदार्थविरोधी विभागाच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. त्याचप्रमाणे, दोन कथित तस्करांनाही अटक केली. लष्कराच्या स्पिअर कोअरने ‘एक्स’वर पोस्ट करत या कारवाईबद्दल माहिती दिली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन वाहनांतून अडीच किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाच्या गर्दीत 40 पेक्षा अधिक मोबाईल आणि आठ मंगळसूत्रे चोरली

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी स्थानिक 350 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, परराज्यातून आणि इतर जिल्ह्यांतून आलेल्या अल्पवयीन तसेच महिला चोरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. या टोळ्यांनी गर्दीत 40 पेक्षा अधिक मोबाईल आणि आठ मंगळसूत्रे चोरली.

TMC : तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर 20 पैकी 17 खासदार एनसीपीआयमधून भाजपमध्ये प्रवेश करणार

तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर व आता नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) सोबत असलेल्या 20 लोकसभा खासदारांपैकी 17 खासदार दुर्गापूजेपूर्वी किंवा त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांच्यापैकी एक खासदार जगदीशचंद्र बर्मा बसुनिया यांनी सोमवारी केला. मात्र, त्यांच्या या दाव्याचे सहकारी बंडखोर खासदार, भाजपने तत्काळ खंडन केले.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघणार

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT