मनोज जरांगे पाटील हे बीडच्या पाटोद्यामध्ये मुक्कामी आहेत, त्यांचा पहिला मुक्काम पाटोद्यात होता. जरांगे पाटलांचा मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. तत्पूर्वी विशेष पोलिस पथकाकडून मनोज जरांगे पाटील हे वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या वाहनाची देखील तपासणी करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे, काल रात्री ते पटोद्यात मुक्कामी होते. आज ते अहिल्यानगरकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, त्यांनी उपचार घ्यावेत अशी विनंती करण्यात आली. मात्र, उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला.
अशोक खरात याने जामीनासाठी अर्ज केला आहे. सध्या एसआयटीचा तपास पूर्ण झाल्याने जामीन मिळावा अशी मागणी त्याने नाशिकच्या न्यायालयात केली आहे. या संदर्भात सरकारी वकिलांकडून यापूर्वीच जामीनाला विरोध झाला आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी अदा करण्यासाठी तसेच आगामी २०२६-२७च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी कारखान्यांना सुलभ अटींवर ‘सॉफ्ट लोन’ देण्यात येणार आहे. या कर्जावरील व्याजासाठी सरकारकडून ७३४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
'उपोषणात दौरा चांगला नाही. आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही. खोपालीपर्यंत जायचा तर माणूस खाऊन पिऊन असला पाहिजे. मी पोलिसांना सांगून पटोद्याहून थेट मुंबईला जाईल.', असे सुतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी सुरू आहे. ठाकरेंच्या वकिलांच्यानंतर शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. आज पुन्हा शिंदेचे वकील निरज कौल हे युक्तिवाद करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.