राज्यात अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून तत्काळ यावर उपाय योजना करण्याची मागणी करणारं पत्र शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी निकषांची वाट न पाहता तात्काळ दुष्काळ जाहीर करून गंभीर तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दिशा सालियन प्रकरणावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया, "आदित्य ठाकरे अशा गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मी भाऊ म्हणून आदित्य ठाकरेंना जेवढं ओळखतो, ते अशा गोष्टींमध्ये ते सहभागी नाही होऊ शकत. बाकी न्यायालयात याबाबत लढा सुरुच आहे.", असं ते म्हणाले.
गडचिरोलीत स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 45 लाख 20 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. कुरखेडा ते आरमोरी रोडवर आयशर ट्रक क्रमांक CG 08 Z 8792 मध्ये लपवून हा गुटखा वाहतूक होत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.