Live Update 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : चाकण एमआयडीसीनंतर आदित्य ठाकरे आज करणार हिंजवडी आयटी पार्क दौरा

Marathi Breaking Live Headlines Updates : महाराष्ट्रातील नाशिक अन् रायगड पालकमंत्री नियुक्ती आणि मराठा आरक्षणासह आज दिवसभरातील विविध राजकीय आणि सामाजिक घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

Hinjawadi IT Park : चाकण एमआयडीसीनंतर आदित्य ठाकरे आज करणार हिंजवडी आयटी पार्क दौरा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील खड्ड्यांची पाहणी करून तेथील उद्योजकांची संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आज आदित्य ठाकरे हिंजवडी आयटी पार्क आणि तेथील एमआयडीसी परिसरातील पाहणी करणार आहेत. चाकण सारखेच मोठ्या प्रमाणात हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ते असते आणि रस्त्यावर पडलेल्य खड्ड्यांमुळे हिंजवडी मान आणि मारुंजी या आयटी पार्क परिसरामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आदित्य ठाकरे आज दुपारी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.

Amit Shah on ISI Network : मोदी सरकारने देशात दहशतवादी अन् विध्वंसक कारवायाचा कट उधळला

स्वातंत्र्यदिनाच्या आधी सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) समर्थित शहजाद भट्टी नेटवर्कविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत 14 राज्यांमधून 253 जणांना ताब्यात घेण्यात आले. या नेटवर्कविरोधात आतापर्यंत 80 हून अधिक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून, 200 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मोदी सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या आसपास देशात दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया करण्याचा कट उधळून लावला.

Mumbai News : मुंबईतील नेव्ही नगरमध्ये नौदलातील जवानाने पत्नी, दोन मुलांची हत्या केल्यानंतर स्वतःचेही संपवले जीवन

मुंबईतील नेव्ही नगरमध्ये नौदलातील जवान पुरणमल मेहरा याने पत्नी ओमा आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. पत्नी व दोन मुलांचा मृत्यू घातपाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरणमलने पत्नी ओमा आणि दोन महिन्यांच्या मुलगा दर्शचा उशीने गुदमरवून जीव घेतल्याचा संशय आहे. मोठा मुलगा यश याला विषारी पदार्थ दिल्याचा संशय असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुरणमलने घराच्या हॉलमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Chakan MIDC : उद्योजकांनंतर स्थानिक तरुणांचा चाकणच्या समस्यांविरोधात एल्गार; आजपासून साखळी उपोषण

चाकण औद्योगिक वसाहतीतील खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावाविरोधात आता स्थानिक तरुणही मैदानात उतरलेत. जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तरुणांकडून आजपासून चाकणमध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

Nashik News : एमआयएम नगरसेवक मतीन मजीद शेख उर्फ पटेलला अखेर सशर्त जामीन

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचा नगरसेवक मतीन मजीद शेख उर्फ पटेल या संशयिताचा नियमित जामीन अर्ज नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. संशयिताला 75 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोगळेकर यांनी हा आदेश दिला.

Dharashiv News : रुग्णालयातील अनावश्यक रेफर थांबवा, रात्रीच्या रुग्णसेवेत सुधारणा करा : आमदार कैलास पाटील

धाराशिवच्या कळंबच्या उप जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, रुग्णांना वारंवार केले जाणारे रेफर, तसेच रात्रीच्या वैद्यकीय सेवाबाबतच्या तक्रारींवर धाराशिव शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ज्यांना नोकरी करायची नाही, ज्यांना स्वतःचे खासगी हॉस्पिटल चालवायचे आहे, त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा. मात्र सरकारी रुग्णालयात राहून रुग्णसेवेत हलकर्जीपणा करू नका आणि तो खपवून घेणार नाही, असेआमदार कैलास पाटील यांनी सुनावले.

Yavatmal Voter List : यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख 62 हजार मतदारांचा शोध लागेना

यवतमाळ जिल्ह्यात मतदारांची एसआयआर मोहीम 17 ऑगस्टला थांबली. या एसआयआर मोहिमेत 2 लाख 65 हजार 816 मतदार सापडले नाही. या मतदारांची नावे आता जिल्हा संकेतस्थळावर पाठविण्यात आली आहेत. या मतदारांना नोटीस बजावल्या जाणार आहे. त्यावर हरकती मागितल्या जाणार असून, एक महिन्यात मतदारांकडून कुठलाच प्रतिसाद न आल्यास ही नावे वगळली जाणार आहे.

Pune News : पुण्यातील मेट्रो प्रकल्प तीनच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निमंत्रण

टाटा समूहाच्या सहकार्याने उभारलेल्या पुणे मेट्रो-तीनचे काम पूर्ण होत आले असून, त्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देशातील पहिली सार्वजनिक-खासगी भागीदारी मेट्रो म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते.

BJP Politics : मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र ‘भाजप’ लोकप्रतिनिधींची बैठक; मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (ता.19) सकाळी 10 वाजता पंचवटीतील आडगाव नाका येथील स्वामी नारायण बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, एसआयआर प्रभारी भगवानदास सबनानी आणि एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT