सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा असणाऱ्या मनोहर भोसले विरुद्ध सहावा गुन्हा करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोग्याचे कारणाचे निराकरण करण्यासाठी तीन अमावस्येला पूजा घालण्यासाठी पैसे घेऊन अश्लील कृत्य करण्याचे काम मनोहर भोसलेकडून झाले आहे. याच बाबत गुन्हा दाखल झाला असून मनोहर भोसले यांच्या सर्व आश्रमातून काही पुरावे देखील सापडलेत. मनोहर भोसले या प्रकरणाची पाच अधिकाऱ्यांची एसआयटी कमिटीच्या माध्यमातून तपासणी व चौकशी सुरू आहे. यामध्ये मनोहर याची 20 हून अधिक बँकांच्या खात्यांची तपासणी केली असता तीन कोटीहून अधिकचे व्यवहार सापडले आहेत.
तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर आले असून, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. आठ दिवसात चौकशी समिती स्थापन होईल. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी ही माहिती दिली. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार, समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याबाबत आदेश असतील.
शरद पवार राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाच्या चर्चा बंद करण्यात आल्याचं सांगितलं जात असलं, तरी अजित पवार राष्ट्रवादीकडून विलनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत, अशी संकेत वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अनेक लोकांच्या भावना तशा आहेत. त्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे वळसे पाटील यांनी म्हटलं.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकारी विभागाकडून देण्यात आलेल्या स्थगितीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आक्षेप घेण्यात आले आहे. सहकार विभागाच्या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. बँकेकडून होणाऱ्या 444 कनिष्ठ लिपिक भरतीला सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचं कारण देत स्थगिती देण्यात आली आहे.
वाशिमच्या कारंजा ते मानोरा मार्गावरील कुपटा घाटात कारची टिप्परला जोरदार धडक बसली. या भीषण अपघात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग चक्काचूर होत, कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे पायलट लक्ष्मण चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धैर्य आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. कारसेवकांनी त्या काळात धैर्य आणि संयम ठेवला असता तर राम मंदिर झालं असतं का? असा सवाल करतानाच त्यावेळी कारसेवकांना संयम आणि धैर्याचं आवाहन का केलं नाही? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुकांबाबत आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक आहे," असं सांगत त्यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुका या पक्षीय राजकारणापलीकडे असल्याचं म्हटलं.
जिल्हा बँक निवडणुकीत सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणं ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचाही त्यांनी दावा केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पक्षाची ताकद सारखी नसते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणं ही सहकार क्षेत्रातील परंपरा आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर स्थानकाजवळ धावत्या लोकलवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या या दगडफेकीत लोकलचे गार्ड गंभीर जखमी झालेय. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या गंभीर घटनेमुळे लोकल मधील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित नेत्यांच्या वर्तनाविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, केंद्रातील भाजप नेत्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रातील नेत्यांनाही सत्तेचा माज आला असून, राज्यातील सुसंस्कृत राजकारणाचा स्तर खालावत चालल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ नेत्याने उघड पत्राद्वारे केला आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री लोकांच्या मृत्यूवर हसणे आणि बेताल वक्तव्ये करणे अशी असंवेदनशीलता दाखवत असतानाही, देवेंद्र फडणवीस यांनी धारण केलेले मौन चिंताजनक आहे, असे म्हणत त्यांनी अमित साटमांच्या विरोधात नाराजी देखील व्यक्त केली आहे.
2019 ते 2022 ला महाविकास आघाडीत काँग्रेससोबत जाताना उबाठाला रामरक्षा आणि हिंदुत्व आठवले नाही का? अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डाॅक्टर हे उपचार करत असून शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती, जाहिरात फलक तसेच संकेतस्थळे व समाज माध्यमांवरील अशा जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी विद्यमान कायद्यांतील दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे आता अशा जाहिरातींवर बंदी येणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज जिल्हाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.