Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : विलेपार्लेतील इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग, दोघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update : मुंबईतील घाटकोपरमध्ये गौसिया चाळीतील ५-६ घरांवर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, यासह राज्यातील विविध घटना जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

‘रिलायन्सचा बायोगॅस वेस्ट पाबळ खोऱ्यात टाकू देणार नाही’; शिंदे शिवसेनेचा इशारा

ANC: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ‘लिक्विड फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर’ म्हणजेच लिक्विड सेंद्रिय खत पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. या वेस्टमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाबळ खोऱ्यात पाहणी केली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यांच्या प्रकल्पाच्या क्षेत्रात वेस्टची विल्हेवाट न लावता तो एका शेतकऱ्याच्या शेतात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस घेणार नाशिकच्या खड्ड्यांप्रश्नी आढावा बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेणार आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळा मंत्र्यांसह महापौर देखील रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. आता महापालिका आयुक्त ही जाग्या झाल्या आहेत. त्यांनी तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन या प्रश्नावर आढावा घेतला. सर्व खड्डे बुजविण्याची मोहीम उघडण्यात आली आहे.

आंबेगाव पोलिसांकडून 3 गावठी अग्निशस्त्रांसह जिवंत काडतूस जप्त

आंबेगाव पोलिसांनी 3 गावठी अग्निशस्त्रांसह जिवंत काडतूस, गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक केली आहे. जांभुळवाडी पाझर तलावाजवळील मोकळ्या जागेत शनिनगर परिसरात पोलिसांची कारवाई करण्यात आली आहे.

‘रिलायन्सचा बायोगॅस वेस्ट पाबळ खोऱ्यात टाकू देणार नाही’; शिंदे शिवसेनेचा इशारा

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ‘लिक्विड फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर’ म्हणजेच लिक्विड सेंद्रिय खत पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेने केला आहे. या वेस्टमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाबळ खोऱ्यात पाहणी केली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यांच्या प्रकल्पाच्या क्षेत्रात वेस्टची विल्हेवाट न लावता तो एका शेतकऱ्याच्या शेतात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.

‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात 16 व्या आरोपीला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन समोर आले असून, भिवंडी पोलिसांनी पोलिसपूर्व प्रशिक्षण संस्था चालवणाऱ्या प्रकाश धनसिंग पवार याला अटक केली आहे. प्रकाश पवारच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या 16 वर पोहोचली आहे. प्रकाश पवारला भिवंडी न्यायालयात एस. एस. घोडके यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे CM फडणवीसांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी (ता.12) एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरेंची ही अचानक भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

प्रकल्पबाधितांना रोजगार द्या - बच्चू कडू

वणी येथे शिंदे शिवसेना पक्षाच्यावतीने प्रकल्पबाधितांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार बच्चू कडू उपस्थित होते. वणी परिसरातील कोळसा खाणींसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधित कुटुंबातील तसेच स्थानिक गावांतील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी प्रमुख मागणी बच्चू कडू यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संभाजी पेठ येथून या तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून, क्रांती चौकात यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही तिरंगा यात्रा होणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे - सुजात आंबेडकर

महाराष्ट्रात आणि देशात मुस्लिम विरुद्ध हिंदू हे भांडण पेटवण्याचे काम भाजपवाल्यांनी केले. ते भांडण मिटवता आले नाही, म्हणून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण केला. ते भांडणही मिटवता आले नाही, म्हणून आता एससी विरुद्ध मातंग आणि अठरापगड जातींमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशामध्ये सध्या ‘आरक्षण हटाव’चे काम सुरू आहे. आपण सर्वांनी या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवले पाहिजे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

विलेपार्लेतील इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग, दोघांचा मृत्यू

मुंबईतील विलेपार्ले भागात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीच्या ११ व्या मजल्याला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. विलेपार्ले येथील 'शांता भवन' या इमारतीत रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास ही आग लागली. या आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह एका २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील - मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय साताऱ्याच्या राजेंनींच नव्हे तर सर्वच मराठा आमदार, खासदारांनी जातीच्या लेकरांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन देखील पाटलांनी केलं आहे.

Maharashtra Live Update : घाटकोपरमध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये गौसिया चाळीतील ५-६ घरांवर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून ६ ते ८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT