बीडमध्ये काल आदिशक्ती मुक्ताईची पालखी दाखल झाली. या पालखीचा दोन दिवस मुक्काम बीडमध्ये असतो.आज दुसऱ्या दिवशी बीड शहरातून या पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे.याच अनुषंगाने पालखी मार्गावर विविध ठिकाणी सजावट करण्यात आल्याने पालखी मार्गावर भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. याच पालखी मार्गावर असलेल्या धोंडीपुरा येथे एका कलाकारांकडून विठ्ठल रुक्मिणीचे तब्बल दहा फुटांची मूर्ती साकारण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या कारवाईत मंचर हे दूध भेसळीचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आल्यानंतर परिसराची बदनामी झाल्याचा आरोप करत आज मंचरमध्ये सर्वपक्षीय एल्गार मोर्चा काढण्यात आला. दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी करत संबंधितांवर तीव्र शब्दांत टीका केली आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूरमध्ये एका 21 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मात्र या घटनेनंतरही अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे असे मृत तरुणाचे नाव असून संतप्त कुटुंबीयांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय.
भारतात गरीब कष्ट करणाऱ्या लोकांना न्याय का मिळत नाही बाकीच्यांना सूट असते. महाराष्ट्रात आणि देशात तीन मोठे क्रायसिस सुरू आहे. महाराष्ट्रात क्राइम वाढलेले आहे. जो डेटा भारत सरकारला मिळाला त्यात पुण्यात शिक्षणाचे हे माहेरघर आहे. ते राज्यात एक नंबर आहे. ड्रग्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. युवा पिढी त्यात वाया चालली आहे. पोलिसांची भीती राहिलेली नाही. नगरसेवक डॉक्टर वर हात उचलत असेल नगरसेवक होताच कामा नये,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
नुसते आरोप करून चालणार नाही. मला विश्वास बसत नाही मर्यादा पुरुषोत्तम राम ज्याचे संस्कार सगळ्यांवर आहे. अनेक नेत्यांनी ही मंदिर व्हावे यासाठी लढा उभा केला होता. त्यात मंदिरात भ्रष्टाचार होत असेल तर यापेक्षा गलिच्छ काय आहे, उज्जैन, अयोध्या, सिद्धिविनायक येथे भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार करणारा वाईट आणि जो बघतो ते पण वाईटच आहे. याची चौकशी का झालेली नाही प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावे लागेल,काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही त्यातलेच अर्धे नेते पक्षात घेतले. मग ते भ्रष्टाचारी होते की नव्हते? जर नव्हते, तर तुम्ही खोटे आरोप केल्याबद्दल त्यांची माफी मागा.भाजपला आता भ्रष्टाचाराचा 'भ' ही काढायचा अधिकार राहिलेला नाही,असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
भाजप संविधानाची पायमल्ली करत ईडी, सीबीआय आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे अस्थिर केली जात आहेत. लोकशाही कमकुवत करून देशात हुकूमशाही हा प्रकार असून भारतीय जनता पक्षाचा खरा अजेंडा “वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी” हा असून देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा घाणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे. '५० खोके एकदम ओके' हा नारा महाराष्ट्रातून बुलंद झाला. आता पक्षांची फोडाफोडी करून विरोधकांची सत्ता संपवण्याचं काम प्रत्येक राज्यात सुरू असल्याचं चित्र आहे. लोकशाहीच्या पुढे आज फार मोठं संकट उभं राहिलं आहे. संविधानाची पायमल्ली, ईडी-सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर आणि विरोधकांची फोडाफोडी हा भारतीय जनता पक्षाचा कारभार झाला आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी १२.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मातोश्री येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेचा विषय राऊत यांनी सांगितलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल), महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 4 रोड ओव्हर ब्रिज (ROB), 4 अंडरपास (सबवे) आणि 1 रोड अंडरब्रिजचे (RUB) लोकार्पण करण्यात आले. महायुती सरकारने महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सहकार्य मिळाले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. वारकऱ्यांना दर्शन सुलभ व सुखकर व्हावे, तसेच पालखी मार्ग अधिक सुविधायुक्त करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना दिली. यंदा एल निनोमुळे दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, राज्याला या संकटातून मुक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही त्यांनी माऊलींच्या चरणी केली.
माजी खासदार झाले याच्या वेदना मला आहेतच, पण मी शांत नाही. शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं, अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांना उत्तर दिले. मी विचारांची पक्की असल्यानेच राज्यसभेसाठी दुसऱ्याच्या दारात गेले नाही, असेही त्या म्हणाल्या. नवनीत राणा या अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या.
जळगावात रेशन कार्डाच्या बहाण्यानं 30 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीये... संशयित सुनील पाटील याला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे... दरम्यान, संतप्त महिलांनी या नराधमाला रस्त्यावरच चांगलाच चोप दिला असून, या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे.....
शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या सूनेच्या तक्रारीनंतर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने फिरोज शेखला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, कथित अघोरी कृत्यांबाबत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर पूर्णविराम लावला आहे... आपल्याला आता भाजपमध्ये जाण्यात कोणताही रस नसून शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं... यावेळी एक खळबळजनक दावा करत त्यांनी गिरीश महाजनांवरही जोरदार निशाणा साधलाय.... त्यानंतर महाजनांनीही खडसेंना जोरदार टोला लगावलाय...
विनायक राऊत यांच्या सुनेने केल्या आरोपानंतर राऊत य म्हणाले, "माझ्या कुटुंबावर लावलेले आरोप खोटे आहेत. गितेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर मागील ३ वर्षांपासून त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर राहत नाही. तक्रारीत २०१८-२२ पर्यंत अघोरी कृत्य केली जात होती, असं लिहिलं आहे. या अघोरी कृत्यावेळी तिचे आई-वडील तिच्याबरोबर होते. मग त्यांनी ताबडतोब तक्रार का केली नाही? त्यांना कोणी अडवलं होतं? असे सवाल उपस्थित करत २०२२ मध्ये झालेल्या अन्यायाची तक्रार २०२६ साली करतायत यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने आरोप केल्यानंतर फिरोजबाबा याला शनिवारी रात्री अकरा वाजता ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. गीतेश राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर जादूटोणा आणि अघोरी कृत्य केल्याचे तक्रारीत आरोप आहे. सावंतवाडी कोलगाव येथील फिरोजबाबा याच्यामार्फत विनायक राऊत व गीतेश राऊत यांनी अघोरी कृत्य केल्याचे आरोप सुनेने केले आहेत. या आरोपीच्या अनुषंगाने सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी फिरोजबाबाला ताब्यात घेतलं आहे.
ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत बविआ आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत अरुण पाटील यांनी विजय मिळवला तर, उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार भाग्यश्री भोईर विजयी झाल्या आहेत.
आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे संबंधित वारकऱ्याला तातडीने जीवनरक्षक उपचार मिळाले. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसेच त्यांच्या समर्पित आरोग्य पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर (Cardio Pulmonary Resuscitation) देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार सुरू केले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी त्वरित वैद्यकीय संस्थेत हलविण्यात आले.
पंढरपूरमध्ये आज सायकल दिंड्या दाखल झाल्या आहेत. नागपूर ,नाशिक, जळगाव , कोल्हापूर , सांगली , पुणे , ठाणे अशा 17 जिल्ह्यातून आलेल्या सायकल स्वरांची एकत्रित आज पंढरपूर शहरातून सकाळी दिंडी काढली. पर्यावरणाचा संदेश देणारे तब्बल 4 हजार सायकल स्वार सायकल दिंडीत सहभागी झाले होते. गेल्या सहा वर्षापासून पंढरपुरात सायकल दिंडी आणि सायकल वारीचा आयोजन केले जाते.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 'राम रक्षा' आंदोलन करण्यात आले. पावन हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या आंदोलनातून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत 'चरणसेवा' उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अहिल्यानगरच्या नेवासा इथले पी. व्ही. बेल्हेकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तसेच डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून दोन ठिकाणी चरणसेवा व आरोग्य सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील संभाव्य बदलांविषयी केलेल्या विधानावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जोरदार पलटवार केला. संजय राऊत हे काही ज्योतिष नाहीत, त्यांचं काम फक्त भांडणं लावण्याचं असल्याची टीका भोंडेकर यांनी केली. भोंडेकर यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेताना संजय राऊत यांचं फक्त ज्योतिष होणे बाकी होते, तेही आता झालेत. पण, ते कोणतेही ज्योतिष वगैरे नाहीत. महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आणि कोण नाही, हे ठरवण्यासाठी महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते पूर्णपणे सक्षम मुख्यमंत्री कोण असेल, हे महायुतीचे नेते योग्य वेळी ठरवतील, असा टोला भोंडेकर यांनी संजय राऊत यांना लगावला.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये जाण्यात त्यांना आता कोणताही इंटरेस्ट नसल्याचं म्हटलं आहे. भाजप प्रवेशामध्ये आता मला इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवारांबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहीन. माझ्या भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छूक आहेत, हे मी मान्य करणार नसल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्या सुनेने अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळासोबतच 'जादूटोणा विरोधी कायद्यान्वये' राऊत कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधिमंडळात गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याला काल वेगळे वळण लागले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचा नेताच या घोटाळ्याचा मास्टरमाइंड निघाला. त्यामुळे शिक्षण विभागातील या घोटाळ्याचा राजकारणाशी थेट संबंध समोर आला आहे. तर शालार्थ आयडी घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्रशांत वाडीले याला धुळे येथून अटक झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वस्तीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाली असून 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेचं शोधकार्य जवळपास चार दिवसांनी पूर्ण झालं आहे. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 14 कामगार बचावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.