Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : मुलाच्या हत्येनंतर विशाल अग्रवाल यांना पितृशोक, लोहगड प्रकरणातील केतनच्या आजोबांचं निधन

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा, यासह आज दिनांक 5 जुलै रोजीच्या राज्यातील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

जिल्हा बँक निवडणूक निकाल खासदार कल्याण काळे विजयी

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक 2026 मतमोजणी सुरूआहे, या निवडणुकीत गंगापूर सोसायटी मतदार संघातून छत्रपती संभाजीनगर सोसायटी मतदारसंघातून खासदार डॉ. कल्याण काळे २२ मतांनी विजयी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक 2026 मतमोजणी सुरू

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक 2026 मतमोजणी सुरू झाली आहे. गंगापूर सोसायटी मतदार संघातून शेषराव जाधव ६ मतांनी विजयी झाले आहेत. तर कन्नड सोसायटी मतदारसंघातून आमदार संजना जाधव ९८ पैकी ९८ मतं घेऊन विजयी झाले आहेत.

एकनाथ शिंदे  डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणखी एक दिवस आराम करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्याचा दिवसही हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, महापालिकेचं आवाहन

मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणातही जोरदार पाऊस पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान खात्यानं बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

मुलाच्या हत्येनंतर विशाल अग्रवाल यांना पितृशोक, लोहगड प्रकरणातील केतनच्या आजोबांचं निधन

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर Miss You Dad अशी पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

वरळी कोणाला आपला सातबारा आहे असं वाटत असेल तर आता तसं काही नाही - अहिर

भंडारी स्ट्रीट रेल्वे पादचारी पूल बंद; प्रवाशांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था

मध्य रेल्वेवरील मशीद रेल्वे स्थानकादरम्यानचा भंडारी स्ट्रीट आणि संत तुकाराम मार्ग यांना जोडणारा भंडारी पालिका रेल्वे पादचारी पूल धोकादायक बनल्यामुळे तातडीने प्रवाशांसाठी बंद करण्यात आला.

लोहगड किल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन

लोहगड किल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या केतन अग्रवालचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे.नातवाच्या हत्येच्या धक्क्यातून ते सावरले नव्हते. त्यामुळे त्याच्या विरहातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचा 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच हवामान खात्याने आजपासून पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला आहे. यामध्ये सातारा आणि पुण्याचाही समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT