Sarkarnama Live Updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : पुण्याच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर बलात्कार, वंचितच्या कार्यकर्त्यांचाही राडा

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Aslam Shanedivan

Vanchi Bahujan aaghadi rada news : पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा यशवंत नाट्यगृहात राडा

पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला असून संगीत सन्न्यस्त खड्ग या नाटकाच्या प्रयागादरम्यान कार्यकर्यांनी घोषणाबाजी केलीय. हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकावर आधारीत आहे. या नाटकातून भगवान गौतम बुद्ध यांचा अपमान केल्याचा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

EPFO News : PF फंड काढण्याच्या नियमामध्ये आणखी एक मोठा बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याच्या नियमामध्ये आता आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीएफच्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर घ्यायचं आहे, ते आपल्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी आपल्या पीएफ खात्यामधून देखील पैसे काढू शकणार आहेत.

Pune Crime : अहिल्यानगर येथून अपहरण केलेल्या युवतीवर आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेत बलात्कार

आळंदी येथील एका एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात महिला किर्तनकाराचाही समावेश असून पोलिसांनी तिच्यासह पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या पीडित युवतीचे अहिल्यानगर येथून अपहरण करण्यात आले होते. तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचेही उघड झाले आहे.

Weather Update : पुढील 7 दिवस धोक्याचे, आयएमडीने हाय अलर्ट

गेल्या एक महिन्यांपासून देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळत आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार पुढील सहा दिवस अनेक राज्यांसाठी हाय अलर्ट असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.

Chandrakant patil News : 'अण्णा मंत्री कसे झाले ते समजलेच नाही', मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत चंद्रकांत पाटलांच्या विधानाची चर्चा!

भाजपमध्ये कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर आणि आता थेट खासदार होऊन केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोहोळ यांच्या मंत्री पदाची वर्षपूर्ती झाली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांचे काही किस्से सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मऊ हेडमास्तर असून मोदी शहा हे कडक हेडमास्तर असल्याचे सांगितले. याची चर्चा राज्यभर होत असतानाच भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची मात्र आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 'अण्णा मंत्री कसे झाले ते समजलेच नाही, आता तर शहां यांना भेटण्यासाठी आधी अण्णांशी बोलावं लागतं. अण्णा अनपेक्षितरित्या केंद्रात मंत्री झाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT