महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर14 जुलै ते 16 जुलैपर्यंत चालणार आहे. या शिबिराला मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मनसेकडून आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठी आतापासूनच रणनिती आखायला सुरूवात केल्याचं दिसत आहे.
देशाची राजधानी दिल्ली येथे एका भरधाव ऑडी कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी मध्य रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. मद्य धुंद ड्रायव्हरचे ऑडी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बीडमधील निपाणी टाकळी गावच्या ग्रामसभेदरम्यान उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी गावात बोगस कामं करून बिलं उचलू नका, असं म्हटलं होतं. तर या ग्रामसभेनंतर बोगस कामासंदर्भात तू कसा काय बोलला? असा जाब विचारत 4 ते 5 जणांनी माजलगाव-परभणी स्त्यावर उपसरपंचाला काठी दगडाने गंभीर मारहाण केली. जखमी चव्हाण यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये लाडकी बहिणी योजनेबाबत बोलताना मोठं वक्तव्य केले. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत आहे. इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटप कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. या अगोदर देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचे विधान केले होते.
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंची एकी होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तसंच या रोखठोक सदरातून त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिंदे, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात. राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात. शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औटघटकेच्या फौजदारासारखे आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून खासदार बनवलं जाणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 4 जणांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे. यामध्ये ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन (इतिहास प्राध्यापक) आणि सी सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे.
तुळजाभवानी मंदिर आता पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडलं जाणार आहे. भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गर्दी कमी हा बदल केल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी (ता.13) भल्या पहाटे सहा वाजल्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आयटी पार्क हिंजवडी येथील विविध समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या भागात साचणारे पावसाचे पाणी, रस्त्याची समस्या, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्याच्या यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसंच रस्त्यावर असलेले अतिक्रमण पाहिल्यानंतर सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी यावेळी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.