Maharashtra Live Updates sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : इस्रायल युद्धबंदी लागू! ट्रम्प यांची घोषणा, भास्कर जाधवांची नाराजी कायम? पुन्हा पक्षावर टीका तर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसह विविध राजकीय घडामोडी...

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Aslam Shanedivan

Israel-Iran War : 'इराणमध्ये सत्ता परिवर्तन नकोच', ट्रम्प यांनी खामेनींबद्दल केलं मोठे विधान; इस्रायललाही इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केली आहे. दोन देशांमध्ये गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू होते. यादरम्यान आता ट्रम्प यांनी, अमेरिकेला इराणमध्ये सत्ता परिवर्तन नको असून असे झाल्यास तेथे अराजकता निर्माण होईल असे भाष्य केलं आहे.

Bhaskar Jadhav News : 'पक्षातले बडवे…', भास्कर जाधवांची पक्षावरच जाहीर नाराजी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव सध्या नाराज असल्याचे समोर येत आहे. तर त्यांनी निवृत्तीचा विचार देखील बोलून दाखवला आहे. याचवेळी पुन्हा एकदा त्यांनी पक्षावर नाजारी व्यक्त करताना जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत पक्षातील बडव्यांवर टीका केली आहे.

Malegaon Karkhana Election News : माळेगाव कारखाना निवडणुकीत महिला गटातून अजित पवारांना झटका; तावरेंच्या पॅनलने खातं उघडलं?

बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीचा निकाल येत आहे. येथे अजित पवारांचे बहुतांश उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असतानाच चंद्रकांत तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलने खातं उघडलं आहे.

Iran Vs Israel : युद्धबंदी? इस्रायल हल्ला करणार नाही; ट्रम्प यांचा दावा

इराण-इस्रायल युद्धामुळे जगभर चिंता व्यक्त केली जात होती. तर अमेरिकेने केलेल्या कारवाईनंतर आणखी स्थिती गंभीर झाली होती. पण आता परिस्थिती वेगाने बदलत असून इराण आणि इस्रायलमध्ये काही तासांपूर्वी युद्धबंदी लागू झाली आहे. याबाबतचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी इस्त्राइलकडून पुन्हा होणार नाहीत असाही दावा केला आहे.

Indian Railways News : बुकिंगसाठी आधारकार्ड अनिवार्य; दलाल किंवा अनधिकृत एजंटला फटका

भारतीय रेल्वेकडून नवीन नियम करण्यात आले असून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. आता 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकिटे बुक करताना आधारकार्ड ऑथेंटिकेशन गरजेचे असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एका आदेशाद्वारे सर्व रेल्वे झोनना याबाबत माहिती दिली आहे. यामुळे आता दलाल किंवा अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे.

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री? तिकीट दरात वाढ

भारतीय रेल्वेने तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कोट्यवधी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार असून नवीन दर 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. तसेच तत्काळ तिकिट बुकिंगसाठी देखील नवीन नियम जारी केले असून त्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केलं आहे.

malegaon sugar factory election : मतमोजणीत अजित पवार गटाचे तीन उमेदवार आघाडीवर?

बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. येथे चार पॅनेल मैदानात उतरले असून थेट लढत जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पॅनेलमध्ये झाली. आता मतमोजणी सुरू असून अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनेल’चे रतनलाल भोसले (441 मत), नितीन कुमार शेंडे (425 मत) आणि महिला गटातून संगीता कोकरे आघाडीवर आहेत. यावेळी तावरे गटाचे सहकार बचाव पॅनलच्या महिला उमेदवार राजश्री कोकरे देखील आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

Bachchu Kadu News : बच्चू कडू यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, बँकेचे अध्यक्ष व संचालक पद कायम

माजी आमदार बच्चू कडू यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असून बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पद कायम ठेवले आहे. काहीच दिवसांपूर्वी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अध्यक्ष पदावरून बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधक यांनी अपात्र ठरवले होते. यामुळे त्यांचे सदस्यत्वही धोक्यात आले होते. तर ही कारवाई नाशिक येथील एका गुन्ह्यात बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा झाल्याने करण्यात आली होती.

South Bharat Jain Sabha : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश! सांगलीचे राजकारण बदलणार?

सांगली जिल्ह्यात भाजप सध्या सूसाट असून काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी प्रवेश केला होता. यापाठोपाठ आता दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील देखील भाजपच्या वाटेवर आहेत. ते आज मंगळवारी (दि. 24) मुंबईत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT