Denmark study tour controversy Sarkarnama
महाराष्ट्र

Denmark study tour controversy : मोदींचा काटकसरीचा संदेश अन् महाराष्ट्रातून डेन्मार्क दौरा; फडणवीस सरकार पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर!

PM Narendra Modi austerity appeal sparks political debate Maharashtra officials and public representatives leave Denmark study tour amid fuel price and forex concerns : काटकसरीचे संदेश, वाहन कपात आणि दौरे रद्द करण्याच्या घोषणांनंतरही महाराष्ट्रातून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या परदेश दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra officials foreign tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन बचत आणि इंधन काटकसरीचे आवाहन केले असताना, महाराष्ट्रातील काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या परदेश दौऱ्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ शनिवारी डेन्मार्कच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले.

महायुतीच्या (Mahayuti) राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या दौऱ्याचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे. 16 ते 24 मे दरम्यान हा अभ्यास दौरा पार पडणार असून, तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक शहरी विकास आणि जलव्यवस्थापन यांचा अभ्यास या दौऱ्यात केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या शिष्टमंडळात महाराष्ट्र (Maharashtra) जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. एस. आर. नाईक, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे, सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते तसेच उमरेडच्या नगराध्यक्षा प्राजक्ता आदमाने यांचा समावेश आहे.

दरम्यान, आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थिती, वाढती इंधन दरवाढ आणि परकीय चलनावरील दबाव याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसह सरकारी यंत्रणेलाही काटकसरीचा संदेश दिला होता. त्यानंतर राज्यातील अनेक मंत्र्यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करणे, मोटारसायकलचा वापर करणे तसेच काही परदेश दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते.

अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा डेन्मार्क दौरा कितपत आवश्यक होता, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, “परदेश दौरे टाळण्याच्या परिपत्रकाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

या दौऱ्यामागील नेमका उद्देश, त्यातून राज्याला होणारा फायदा आणि खर्चाचे औचित्य यावर आगामी काळात अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. काटकसरीचा काळ असतानाच, पंतप्रधानांनी आवाहन केलं असताना, हा परदेश दौरा कसा? यावर विरोधक हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT