जसा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये द्या, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मतदारांना केलं आहे.निवडणुकीत महायुतीला निवडून द्या, अशी अॅडवान्समध्ये विनंती करतो, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 14 जून 2025 रोजी होणाऱ्या त्यांच्या वाढदिवशी 'शिवतीर्था'वर येऊ नये, असे आवाहन मनसैनिकांना पत्राद्वारे केलं आहे. यावेळी पत्रात त्यांनी कुटुंबासह आपण मुंबईबाहेर असल्यानं भेट होणार नाही, असंही म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना लोकोपयोगी कार्य करण्याचं आवाहनही केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश मे महिन्यात दिले होते. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतची नव्यानं सुनावणी बुधवार(ता.11)पासून मुंबई उच्च न्यायालयात होत आहे. आता याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या 18 जुलैला होणार आहे.
नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील काही नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी संगनमत करून पोलीस आयुक्तालयच बळकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कठोर पावलं उचलत तब्बल 21 नामवंत बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील माझोरी येथे गेल्या काही दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या आंदोलनस्थळीच असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे पुढचा अर्धा तास त्यांना कोणालाही भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.