राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा भाजप सोडून इतर पक्षांसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक नेते घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्थानिक नेते ठरवतील, ही आमच्या पक्षाची गेली २६ वर्षांपासूनची लाईन आहे, ती आता कायम राहील. एखाद्या महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली तर जाणार का, या प्रश्नावर ‘आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार की छत्री घेणार याबाबतचा निर्णय मी अजून घेतलेला नाही,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले.
गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेत अडीचशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या विमान दुर्घटनेची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे. तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेसह विविध यंत्रणांची पथके घटनास्थळी पोचली आहेत. या यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
दिव्यांगांचे विविध प्रश्न आणि शेतकरी कर्जमाफीसह विविध विषयांच्या अनुषंगाने गेली पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे बच्चू कडू यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी करमाळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दर्शविला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे नोटीफिकशन निघाले आहे, त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुती आणि आघाडीमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी, चर्चेला सुरुवात झाली आहे. मोठ्या पक्षांमुळे रिपब्लिकन पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यास आणखी बरेच कारणे आहेत. या सर्व धबडग्यात महापालिकेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संयुक्त रिपब्लिकन आघाडीने २००७ चा फॉर्म्युला वापरण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी एक सदस्यीय पद्धत होती, त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होतो, हे निकालानंतरच दिसून कळणार आहे.
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समध्ये दोन महत्वपूर्ण उपकरणे असतात, त्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हाऊस रेकॉर्डर यांचा समावेश असतो. विमानाच्या ‘टेक ऑफ’ पासून विमान कोसळेपर्यंत वैमानिक आणि एटीएसमध्ये काय बोलणं झालं हे सगळं कॉकपिट व्हाऊस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होत असते. तसेच विमानातील विविध यंत्रणांची काय स्थिती होती, ते व्यवस्थित काम करत होती का, हा सगळा डेटा फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये टिपला जातो, त्यामुळे अहमदाबादमधील विमान अपघात नेमका कशामुळे झाला, हे कळू शकणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसट यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं. वडिलांना (उद्धव ठाकरे) त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना फार फार शुभेच्छा. भविष्यात आणखी मोठा नेता त्यांनी व्हावं, अशी आमच्या आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी अजब विधान केले आहे. कोरोना झाला तरी आता कुठेही ॲडमिट होण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.