Manisha Kayannde News Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : पंढरपूरच्या वारीत नक्षलवादी घुसल्याचा शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांचा खळबळजनक दावा..

राज्यातील ताज्या राजकीय घडामोडी आता एका क्लीकवर, Sarkarnama Live Updates

Jagdish Pansare

Amruta Fadnavis : कोणतेही बंधु एकत्र आले, दूरचे लोक जवळ आले तर आनंदच

आम्ही प्रेम प्रमोट करतो, असं अमृता फडणवीस यांनी म्हंटलं आहे. कोणतेही बंधु एकत्र आले, दूरचे लोक जवळ आले तर यात आनंदच आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवरील प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. तर लहानपणी मुलं भाषा लवकर शिकू शकतात. त्यामुळे हिंदी भाषेचाही समावेश असावा, अनेक भाषांचा समावेश असावा, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

Narendra Jadhav : त्रिभाषा समितीचे नवे अध्यक्ष नरेंद्र जाधवही म्हणतात मराठीला प्राधान्य असायला हवे..

अध्यक्षाच्या नावाची घोषणा झालेली आहे, समितीत अनेक लोक असणार आहेत. तीन महिने हातात आहेत. माशेलकर समितीचा अभ्यास करणार आहोत. माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करणार आहोत. विरोध करणाऱ्या नेत्यांची बाजू समजून घेवून, अहवाल तयार करणार आहोत. अजून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली नाही.  मराठीला प्राधान्य असायला हवे, असं नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे. त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.

Anil Parab : अनिल परबांनी सभागृहात लिंबू मिरची आणत भरत गोगावलेंना डिवचले..

अनिल परब यांनी विधानपरिषदेत लिंबू मिरची दाखवत भरत गोगवले यांच्यावर टीका केली आहे. रायगडमध्ये अघोरी प्रथा सुरू आहे, पालकमंत्री पदावरून आमच्या बहिणीबाबत बरंवाईट मनात असू शकतं असं म्हणत परब यांनी अदिती तटकरे यांच्याबाबत बोलताना भरत गोगवले यांच्यावर निशाणा साधला.

Babasaheb Patil : लातूरमध्ये औताला जुंपून घेणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील फेडणार..

शेतीकामाचा खर्च परवडणारा नसल्याने एका वृद्ध दांपत्याने स्वत:ला औताला जुंपून घेत शेतीची कामं केल्याचा व्हिडीओ लातूरमधून समोर आला आहे. लातूरच्या हडोळती गावच्या वृद्ध दाम्पत्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांकडून या वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यात येत आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील या वृद्ध आजी – आजोबाना फोन केला असुन तुमचं कर्ज मी फेडतो, अशी ग्वाही देत मदतीचा हात पुढे केला आहे. 

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार मंत्री असताना घेतलेला ५० हजार दंडाचा निर्णय रद्द..

विना परवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाने ५० हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय घेत मोठं पाऊल उचललं होतं. कारण, यापूर्वी झाडं तोडणाऱ्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या सूचनेवरुन हा निर्णय मागे घेतला गेला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात. मात्र, असं असताना एक नवीनच प्रकार समोर आला आहे,  काही अर्बन नक्षलवादी वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT