जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत मजूर करण्यात आले. या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल 9 जुलै रोजी विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला होता. विरोधकांच्या आक्षेपानंतर या विधेयकात काहीसे बदल करण्यात आले आणि ते विधानसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले.
जनसुरक्षा विधेयक गुरुवारी विधानसभेत मांडण्यात आलं. या विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीचा अहवाल 9 जुलै रोजी विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला होता. विरोधकांच्या आक्षेपानंतर या विधेयकात काहीसे बदल करण्यात आले आणि ते विधानसभेत मांडण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हे विधेयक मांडलं.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ठ दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत कॅन्टीनमध्ये मोठा गोंधळ घातला होता. संजय गायकवाड यांनी यावेळी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण देखील केली होती. संबंधित घटना ही दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी आणि धमकी प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ माजवली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, 2016-17 मध्ये घडलेल्या या प्रकरणात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले नाहीत, तसेच कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही.
शिक्षण विभागात एक महापॉवरफुल अधिकारी मागील तारखा टाकून लाखो रुपये उचलत असल्याचा आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केला. संजय उपाध्याय यांनी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि त्यांच्या विरोधात लक्षवेधी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.