Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates : मनसे नेत्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक सुरू

राज्यातील ताज्या राजकीय घडामोडी आता एका क्लीकवर, Sarkarnama Live Updates

Vijaykumar Dudhale

MNS NEWS : मनसे नेत्यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राज ठाकरे यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून शनिवारी (ता. 05 जुलै) होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

Bandatatya Karadkar : गर्दीचा फायदा घेऊन नास्तिकवादी लोक वारीत घुसूत आहेत : बंडातात्या कराडकर

गर्दीचा फायदा घेऊन नास्तिकवादी लोक वारीत घुसूत आहेत. हे लोक आपलं तत्वज्ञान गळी उतरविण्याचं काम करत आहेत. तुम्ही देव मानत नसाल तर देवाच्या रस्त्यावर तुम्ही का यावं. आमचा मार्ग धर्माचा आहे, या मार्गावर तुम्ही येऊ नये. नास्तिकवादी लोकांना वारीसारख्या ठिकाणी प्रवेशच मिळू देऊ नये, असा प्रयत्न करावा. आपल्या तत्वज्ञानावर घाला घालणारे हे छुपे रुस्तम आहेत, त्यामुळे त्यांच्या मताला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे

Ashish Shelar : शेतकरी आत्महत्येबद्दल सरकार गंभीर : आशिष शेलार

शेतकरी आत्महत्येबद्दल सरकार गंभीरपणे काम करत आहे. सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या अधिकच्या योजना याबाबत काम चालू आहे. आत्महत्येबाबत सरकार गंभीर, संवेदनशील आहे. मुख्यमंत्री अथवा कृषिमंत्री यावर योग्य निर्णय घेऊन कार्यक्रम घाेषित करतील, असे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केदार सोमणाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केदार सोमण याच्या विरोधात मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. पोलिस केदार सोमण याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जात असताना कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर गोंधळ घातला. तसेच, सोमण याला चोप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील नवाझ भागात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Marathi : मराठीचा आग्रह महाराष्ट्रात नाही करायचा, तर कुठे करायचा? : जयंत पाटील

हिंदी सक्तीविरोधात आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानिमित्ताने विजयी मेळावा होतो आहे. राज ठाकरेंसंदर्भात अद्याप महाविकास आघाडीसंदर्भात बोलणं झालेले नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मनसेकडून मराठी झालेल्या मारहाणीबाबत ते म्हणाले, मराठीचा आग्रह महाराष्ट्रात नाही करायचा, तर कुठे करायचा? मारहाणीचं समर्थन नाही. मात्र, लोकांनी भावना समजून घ्याव्यात.

Jayant Patil : आदित्य ठाकरेंवरील आरोपात तथ्य नाही, याचा आनंद : जयंत पाटील

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जाते. मात्र, आदित्य ठाकरे काही त्या प्रवृत्तीचे नाहीत. मी त्यांना जवळून ओळखतो, सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही चांगले ओळखतो. ते असं काही करु शकतील, असं वाटत नाही. भाजपकडून यासंदर्भात आदित्यवर आरोप करण्यात आले होते, त्यात तथ्य नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे, याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT