Fadnavis in  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update - संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला हजर राहणारे, फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Mayur Ratnaparkhe

फडणवीसांनी लावला राणेंनंतर नंबर

देहू येथे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आतापर्यंत 1995 मध्ये नारायण राणे मुख्यमंत्री असताना आले होते, त्यानंतर देवेंद्र फडवणीस हे दुसरे मुख्यमंत्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आल्याचे माजी विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितले आहे.

महेश लांडगेंचा अजित पवारांवर निशाणा?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याच्या स्पर्धेला सुरुवात पाहायला मिळत आहे. या श्रेय वादाला आता आणखी धार देत भाजपचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचला. पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये आमदार महेश लांडगे बोलत होते ते म्हणाले,"मी पैलवान आहे, कोणालाही घाबरत नाही. समोरच्याला अंगावर घेण्याची सवय आहे," असं म्हणत अप्रत्यक्षपणे महेश लांडगे यांनी अजित पवारांनाच आव्हान दिलं असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्र्यांची वारकऱ्यांसोबत फुगडी

वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महापर्व असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा एक आगळावेगळा आणि उत्साहवर्धक क्षण अनुभवायला मिळाला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत वारकऱ्यांमध्ये मिसळून, भक्तिभावाने फुगडी खेळत उपस्थितांचे मन जिंकले.

अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघातामध्ये वारकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना देहू-आळंदी रोडवर घडली. क्रेनने रस्त्यावरून जाणाऱ्या वारकऱ्याला चिरडलं. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्याचा मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT