Raju Shetti On Shaktipeeth Highway : राज्यात महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ड्रिम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला रेटण्याचे काम सुरू केलं आहे. पण धाराशिवमध्ये शेतकरी आंदोलनाचा धसका सरकारने घेतला असून मोजणी करण्याचा निर्णय थांबवला आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल करत हे सरकार कसाबपेक्षाही वाईट वागणूक शेतकऱ्यांना देत असल्याचे म्हटलं आहे.
साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिराची संरक्षण भिंत कोसळली आहे. येथे लिफ्ट आणि स्काय वाँकचे काम सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला होता. याच कामासाठी पश्चिम बाजूचा भाग पोखरला होता. तो भाग सुरक्षित न केल्याने आता पावसाळ्यात मंदिराची सुरक्षा भिंत कोसळली आहे. ज्यामुळे पूजा साहित्य व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी अचानक वाढलेल्या मतांबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती फेटाळली होती. यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित करत अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत विचारणा केली आहे. तसेच 'मतदानाची आकडेवारी आयोग मान्य करत असेल, तर त्या अनुषंगाने नोंदी आहेत का? हे आम्ही विचारले आहे.
हिंदीवरून राज ठाकरे यांनी सरकारच्याविरोधात भूमिका घेतली आहे. तसाच पवित्रा उद्धव ठाकरे यांनी देखील घेतला असून ते यासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची होळी करणार आहेत. तर राज ठाकरे 5 जुलैला मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. त्यावर सर्वांचेच लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील या मोर्चावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप याबाबत कोणी माहिती दिली नसून माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदीच सक्ती नसायला हवी, असे त्यांनी म्हटलं आहे.
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आता राज ठाकरे यांनी या धोरणाविरोधात आंदोलनाची घोषणा केली असून ते 5 जुलै रोजी करण्यात येणार आहे. याचदरम्यान मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या याची राजकीय वर्तुळात मोठा चर्चा होत आहे. या प्रस्तावात हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नकोत, अशी भूमीका मनसेनं घेतली आहे.
विसावदार मतदारसंघातून गोपाल इटालिया हे निवडून आले आहेत. त्यांच्या विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील लोकांना आता बदल हवा आहे, असे विधान केले होते. पण 72 तासांतच बोटाद मतदारसंघाचे आमदार उमेश मकवाना यांनी बंड पुकारले आहे.
गुहागर तालुक्यातील 35 लाखाच्या विकास कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली असताना त्याला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून माजी आ. डॉ. विनय नातू चांगलेच भडकले असून त्यांनी यावरून जोरदार आरोप केले आहेत. तसेच याबाबत मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले आहे.
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हिंदी भाषा विषयाच्या सक्तीला टोकाचा विरोध करण्यासाठी येत्या 6 जुलैवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पण आता ही तारीख बदलल्यात आली असून तो मोर्चा 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.
Vishal Patil on Jayshree Patil News : 'आमच्या घरात सुद्धा भाजपने फुट पाडली; भविष्यात....' विशाल पाटलांना इशारा
नुकताच काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानंतर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा विशाल पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल करताना थेट इशाराच दिला आहे. त्यांनी, भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात सुद्धा फुट पाडली. घरात फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा त्यांनी प्रवेश करून घेतला. पालकमंत्री ही रोज विशाल पाटलांना आम्ही घेणार असं भाष्य करतात. भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून मी अपक्ष निवडून आलोय. मी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळे याचा भाजपला भविष्यात नक्कीच पश्चापात होणार असाही इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.