Manoj Jarange 500 Crore Audio Clip Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जरांगेंनी बाहेर आणलेल्या ऑडिओ क्लीपमुळं शिंदेसेनेची उडाली झोप! शिष्टमंडळ घेणार फडणवीसांची भेट

Maharashtra Politics: दसरा मेळाव्यात बीडच्या नारायणगडावरुन मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांवरुन सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Amit Ujagare

Maharashtra Politics: दसरा मेळाव्यात बीडच्या नारायणगडावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांवरुन सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सुरुवातीला शिंदेंच्यावतीनं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जरांगेंना पुरावे देण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार, जरांगेंनी आज एक ऑडिओ क्लीप पुरावा म्हणून सादर केली.

या ऑडिओ क्लीपनं एकच खळबळ उडवून दिली आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नसली तरी त्यातील एकूणच चर्चांमधून शिंदे सेनेची आता झोप उडाली आहे. त्यामुळं आता शिवसेनेचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

संध्याकाळी घेणार भेट

शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजच भेट घेणार आहेत, संध्याकाळी ७ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांबाबत हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या कथित ऑडिओ क्लीपमध्ये भाजपच्या नेत्यांचा उल्लेख आला आहे, त्यामुळं या क्लीपची सखोल चौकशी करावी अशी मागणी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडं करणार आहे.

भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणी

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बदनामीची सुपारी कोणी दिली? असा सवाल शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. तर उद्योगमंत्री आणि शिंदेंचे सहकारी असलेले उदय सामंत यांनी भाजपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रीकांत शिंदे यांचं नाव घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची बदनामी करण्याचा प्रयत्न दोन-अडीच वर्षांपूर्वी झाला का? असा सवालही त्यांनी केला. तसंच ही क्लीप खरी असल्यास त्यावर भाजपनं स्पष्टीकरण द्यावं असं सामंत यांनी म्हटलं आहे. तर या प्रकरणाची एसआयटी नेमून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे.

श्रीकांत शिंदेंचं अद्याप स्पष्टीकरण नाही

दरम्यान, या प्रकरणात नाव आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावर उद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT