ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण त्यांच्या बैठकांमध्ये किती आमदार-खासदार जातात, हे एकदा मोजून बघा. आता विश्वास राहिला नाही. ते नेहमी मीटिंग लावतात, मागे १० दिवसांपूर्वी मीटिंग लावली, अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत. मग मीटिंग पुढे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आणि ऑपरेशन टायगर हे काय एका महिन्यात चालू आहे? आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे. सगळ्यांना आमच्या पक्षामध्ये येण्यामध्ये इंटरेस्ट आहे. शिंदेसाहेब २४ तास उपलब्धत आहेत.
यवतमाळ शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये परिचारिका महिलेची धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केल्याची घटना घडली. कुसुम चांदेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कुसुम चांदेकर ही महिला एका खाजगी रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने तिचा यात जागीच मृत्यू झाला. नेमकी महिलेची हत्या का करण्यात आली याचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान या प्रकरणातील मारेकरी मात्र घटनास्थळावरून पसार झाले असून अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह वळसे पाटील यांनी धरला असताना फडणवीसांनी केलेल्या एका सूचक खुलाशामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यवतमाळ शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये परिचारिका महिलेची धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या केल्याची घटना घडली. कुसुम चांदेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कुसुम चांदेकर ही महिला एका खाजगी रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने तिचा यात जागीच मृत्यू झाला नेमकी महिलेची हत्या का करण्यात आली याचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान या प्रकरणातील मारेकरी मात्र घटनास्थळावरून पसार झाले असून अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
विधान परिषद निवडणूक सुरू असताना भंडाऱ्याचे शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे या निवडणुकीपासून दूर आहेत. ते नाराज असल्याची चर्चा सुरुवातीपासून सुरू आहे. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशीही आणि पहिल्या सभेत महायुतीचे सर्व नेते उपस्थित असताना भोंडेकर हे कार्यक्रमात उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची पहिल्या दिवसापासून चर्चा आहे. आता विधान परिषद निवडणुकीत अंतिम टप्प्यात आलेली असताना भोंडेकर या निवडणुकीपासून दूर असल्यानं त्यांची नाराजी दूर करण्याकरिता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः भंडाऱ्यात भोंडेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. साधारणतः अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर आठवले यांनी उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवली. त्यावेळी खासदार भोसलेही हास्यविनोदात रंगले होते.
पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दोन दिवस बंद राहणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या २३ आणि २४ जून रोजी दर्शनासाठी बंद राहणार आहे.
नाशिकमध्येही महायुतीमध्ये नाराजीनाट्य कायम असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी थोडी सुधारणा करायला पाहिजे. मागच्या वेळीही आम्ही कळत-नकळत मदत केली होती. पण गेल्या सहा वर्षांत त्यांनी आमचं एकही काम केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दराडे यांना शंभर टक्के मदत करू. पण निवडणूक झाल्यावर उमेदवाराने जमिनीवर राहावं, अशी आमची अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोकसभा सहापर्यंत होती, त्यानंतर सहा वाजता नाटकाचा प्रयोग होणार होता. मात्र, शोकसभेला वेळ झाल्याने नाटक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सभागृहाच्या बाहेर गोंधळ घातला.
शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील आमदार सुहास बाबर यांनी आज (ता. १३ जून) भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. तानाजी पाटील यांना माघार घ्यावी लागल्याने बाबर हे नाराज आहे. बाबर यांच्या घरी जाऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे मंत्री आणि नेते उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.
लातूर -नांदेड महामार्गावर तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. कंटेनर, कार आणि दुचाकी या तीन वाहनांची विचित्र प्रकार धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोघे आणि कारमधील एकाचा अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.
शिवसेनेच्या नेत्या रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विधान परिषद निवडणुकीतून माघारीची घोषणा केली आहे, त्यामुळे जळगावात आता महायुती, महाविकास आघाडी आणि एका अपक्षामध्ये लढत होत आहे. दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अपक्ष आणि महाआघाडीचे उमेदवारही संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्याला महाआघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी उत्तर देताना महायुतीमधील अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे. रविवारी (१४ जूनला) मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी, 'ये डर अच्छा हैं… ही भीती असली पाहिजे…' असे वक्तव्य केले आहे. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार आहेत. ऑपेरशन टायगरबाबत एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे असं त्या म्हणाल्या.
उत्तर महाराष्ट्रात तब्बल 750 बोगस शालार्थ आयडींचा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेशी संबंधित शालार्थ प्रणालीमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे. बोगस आयडींच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाला का, याचाही तपास केला जात आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे नेते आणि बंधू अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. दोन्ही युवा नेत्यांच्या या भेटीमुळे ठाकरे कुटुंबातील कौटुंबिक जिव्हाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डेहराडून येथील प्रतिष्ठित भारतीय लष्करी अकॅडमीच्या 158 व्या पासिंग आउट परेडला संबोधित केले. त्यांनी संस्थेच्या गौरवशाली परंपरेचे कौतुक करत नव्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना देशसेवेच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या भव्य सोहळ्यात नव्याने अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या कॅडेट्सच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणाचा गौरव करण्यात आला.
संजय राऊत सांगतील मग खातेवाटप होत असेल, तर मग काय बोलावं? सुनेत्राताई यात लक्ष घालतील, त्या बोलतील," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवणे यातच शहाणपण आहे. राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थखातं सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही असं राऊत म्हणाले होते , त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं.
रोहित पवार यांना कर्जमाफीचा अभ्यास नाही. कर्जमाफीचा शेतकरी लाभ घेत आहेत. अडचण असेल तर स्थानिक जिल्हाधिकारी यांना तक्रार करून निवारण करतील. रोहित पवार यांची मागणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीची नाही तर त्याच्या सहकारी बँकांनी कर्ज दिले त्याचा विषय आहे. त्यांना शेतकऱ्याची कोणतीही पोठतिडक नाही, असा आरोप परिणय फुके यांनी केला आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नवा वाद उदभवण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. उपवर्गीकरण लागू केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. समाजकल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचे स्वतंत्र उपविभाजन करण्यात आलं आहे. जाहिरातीत प्रवर्गाचा कॉलममध्ये 'मांग', 'मेहतर' आणि 'इतर एससी' असा उल्लेख असल्यानं सामाजिक संघटनांचा तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात एससी उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असतानाच नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे. जाहिरातीमागील कायदेशीर आधार सार्वजनिक करण्याची मागणी.
कोकणात जाणाऱ्या मार्गावर इंदापुर आणि माणगावमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तीन किलो मिटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरु होण्याच्या कालावधील शेवटचा विकएन्ड असल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे
जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी माघार घेतली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील मुचुंडी येथे प्रशासकीय यंत्रणेने राष्ट्रीय गुहागर मार्गावरील दलित कुटुंबाची दुकाने सील केली आहेत. याच निषेधार्थ राष्ट्रीय दलित पँथर सेने तर्फे जतच्या प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. राजकीय द्वेषा पोटी दलित कुटुंबावर अन्याय केला जात आहे. त्याचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर येत्या दोन दिवसात योग्य तोडगा नाही निघाला तर मुचंडी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
भिवंडी पालिकेत स्वच्छता कॅबिनमध्ये गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मॅजिक पेनच्या माध्यमातून बोगस स्वाक्षरी करून हजेरी लावणाऱ्या आरोग्य निरीक्षकास पालिका आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त विक्रम दराडे यांनी निलंबित केले आहे. संतोष जाधव असे निलंबित आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे. भिवंडीत नगरसेवक स्वच्छतेच्या प्रश्नावर आग्रही आहेत. प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक अब्दुल रहमान खान उर्फ सद्दाम भाई यांनी याबाबत आपल्या प्रभागातील स्वच्छता कॅबिनमध्ये पाळत ठेवून तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आमदार अंबादास दानवे यांचे सत्ताधारी पक्षावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सर्व जागा ताकदीने लढत आहे. धाराशिव-लातूर-बीडची जागाही आम्ही पूर्ण ताकदीने लढत आहोत. मात्र सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीत नवीन तंत्र वापरले जात असून, इलेक्शन होण्याऐवजी 'सिलेक्शन' व्हावे यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप दानवे यांनी केला.
राष्ट्रीय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी बनावट लाभार्थी शोधण्याच्या दृष्टीने शासनाच्या 'मिशन सुधार' मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 23,574 रेशनकार्डाची पडताळणी होणार आहे. यापैकी दुबार असलेली 1553 आणि आधार क्रमांक नसलेली अशी 476 मिळून एकूण 5729 रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत.
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यावर आमच्याकडे काम आहे, विकास आहे, समोरच्या उमेदवाराकडे बोलण्यासारखं काहीच नाही, म्हणून काहीही बोलतात, असा हल्लाबोल भाजपच्या बसवराज पाटील यांनी चढवला. त्याला काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ओपन चॅलेंज केले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीवर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ठाम आहेत. कालपासून आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. रात्री त्यांची आरोग्य तपासणी केली. सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान सरकारने मागणी मान्य केल्याशिवाय आंदोलनातून मागे हटणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी व विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
पाच महिन्यांनंतर 15 जूनपासून श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भिमाशंकरमध्ये दाखल होत असून विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा, सुरक्षा व्यवस्थेचा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा सखोल आढावा घेणार आहेत.
एल निनोमुळे यंदा राज्यात सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडण्याचा तसेच आॅगस्ट-सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात 22 जूननंतर मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेपरफुटीनंतर 21 जून रोजी होत असलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्ष संस्थेने घेतला आहे. विद्यार्थ्य़ांना 15 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. याशिवाय परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.