छत्रपती संभाजीनगर शहराच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या अभावावर मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयात योजनेच्या प्रगतीचा आढावा, अपूर्ण कामांची स्थिती आणि कामांच्या विलंब या बाबत सविस्तर चर्चा झाली. सुनावणी दरम्यान मजीप्रचे विधीज्ञ ॲड. राजेंद्र देशमुख व ठेकेदार कंपनीचे विधीज्ञ ॲड. रमेश धोर्डे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचेही दिसून आले.
ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चांना आदित्य ठाकरेंनी पूर्णविराम लावला आहे. ते म्हणाले, अफवांवर विश्वास ठेवू नका. बैठकीला सगळेच खासदार उपस्थित होते. आमच्या आमच्या खासदारांवर विश्वास आहे.
पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मात्र, आदित्य ठाकरे बैठकीवरून निघून जाताच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. आज जयपूरमध्ये ते आंदोलनात सहभागी झाले होते. यादरम्यान ही मारहाण झाल्याचे समजते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ऑपरेशन टायगरमध्ये आपले नाव सतत कसे चर्चेत येते, असा सवाल करत त्यांनी आपण ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीला ऑनलाईन हजर असल्याचेही स्पष्ट केले आहे. ते सध्या मतदारसंघात आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने शासकीय वाहनाचा वैयक्तिक कामासाठी वापर केल्याचा आरोप समोर आला आहे. घरगुती किराणा आणण्यासाठी सरकारी गाडी वापरल्याची चर्चा रंगली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नवी मुंबईतील एका आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच आमदार गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांनी कठोर शब्दांत इशारा दिल्याने नवी मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पंढरपुरातील तांदूळवाडी गावाता झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झालेत.... ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तेथील एका स्थानिक मजुरानं स्वतःचा जीव धोक्यात घालून 2 वर्षांच्या बालकासह 5 जणांचे प्राण वाचवलेत... त्याच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय..
नवी मुंबईत आरोग्य सेवांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय. त्यामुळे नवा वाद पेटलाय. पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईक, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदेंचं नाव गायब असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
सरकारच्या ऑपरेशन टायगरवर शर्मिला ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांना तेवढच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजप, RSS विश्व हिंदु परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती. कुठे आहेत ती आता? त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? असा सवाल त्यांनी केला.
नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवलीय. खरेदीचे उद्दिष्ट अपयशी ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. 30 जूनपर्यंत एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट असताना, आतापर्यंत केवळ 260 मेट्रिक टन खरेदी झाली आहे. नाफेडनं भाववाढ देऊनही खरेदीला गती मिळालेली नाही. त्यामुळे पुढील 15 दिवसांत उद्दिष्ट पूर्ण करण्याचं मोठं आव्हान नाफेडसमोर आहे...
आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे.
शेतकरी प्रश्नासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. उद्या राज्यभरात आंदोलन करणार आहे. कर्ज माफी नको तर कर्जमुक्ती सरकारने करावी, यासाठी संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे.
तब्बल पाच महिन्यांनंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाने दर्शनासाठी शिस्तबद्ध नियोजन केले असून पूर्व-बुकिंग असलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहेत.
पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल विभागात थेट 'खांदेपालट' करण्याचा धडक निर्णय घेतला असून जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल सहाय्यक अशा तब्बल २८५ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया आज सोमवारी पार पडणार आहे. या बदल्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींना वेग आला असून अनेक वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्यांना आता नव्या जागी धाडण्यात येणार आहे.
मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामातील वादावरून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर या 14 वर्षीय मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश विठोबा गडदे याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक सीमा भागात मैत्रिणीसोबत लॉजवर असताना गडदे सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही कारवाई करत त्याला अटक केली.
मुंबई विमानतळाला शनिवारी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर बॉम्ब शोधक पथकाने विमानतळ परिसर आणि आसपासच्या भागाची तपासणी केली असताही धमकी बनावट असल्याचं समोर आलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये बराच काळ प्रलंबित असलेल्या शांतता करारावर सहमती झाल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.