नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेत महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत. 13 पैकी आठ आखाडे एकत्र आले आहेत. त्यांनी हरिद्वार येथे आपले पदाधिकारी घोषित केले. त्यानुसार अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी महंत रवींद्र पुरी महाराज, उपाध्यक्षपदी दुर्गादास महाराज, महामंत्री पदी महंत राजेंद्र प्रसाद आणि राजेंद्रदास, सहसंयोजक पदी महंत शंकर दास महाराज, मंत्रीपदी वैष्णव दास महाराज तर राष्ट्रीय प्रवक्तेपदी महंत ज्ञानदास महाराज यांचे उत्तराधिकारी महंत संजय दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबईच्या भायखळ्यात मोहरमदरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या होत्या. या प्रकरणात आरोपी फैयाज निसार हुसैन प्रेमजी याने आपण सूडाच्या भावनेतून मुस्लीम समाजातील लोकांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता त्यातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.