खासदार सुप्रिया सुळे या आज पुणे शहाराचा दौरा करणार असून पुण्यातील सिंहगड रोडवर सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या उड्डाणपूलाचे काम सुरूच आहे. अधिकाऱ्यांसमवेत सुप्रिया सुळे करणार कामाची पाहणी करणार आहेत.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्याशी भाजपचा संबंध नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे. दीपक काटेनी प्रवीण गायकवाड यांच्यासोबत असे वर्तन करायला नको होते आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार हे काळा शर्ट परिधान करून विधान भवन परिसरात आले आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध रोहित पवार यांनी केला. तसेच त्यांना मारहण्याचा प्लॅन होता असा आरोप केला.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी खोटी वैद्यकीय बिले दाखवून 86 लाख रूपयाची शासनाची फसवणूक केली. तेच राजेश क्षीरसागर आता शक्तीपीठ महामार्गात बोगस शेतकरी दाखवून 50 हजार कोटीत ढपल्यामध्ये हिस्सा घेण्यासाठी खटाटोप करत आहेत. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केला आहे.
नाशिकमधील इगतपूरी येथे आजपासून मनसेचे तीन दिवशीय शिबिर सुरू होत आहे. या शिबिरात मनसे प्रमुख राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका कशा लढायच्या यावर ते भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रवीण गायकवडा यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते म्हणाले, ज्यांनी हल्ला केला त्यांचे फोटो कोणासोबत आहेत ते पाहा. त्यामुळे हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा मी आरोप करतोय असे आव्हाड म्हणाले.
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तब्बल 2 वर्षांनी सुप्रीम कोर्टात सुनावणी आज होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल द्यावा, अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केली होती.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकनंतर या हल्ल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशारितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.