Manoj Jarange Patil Nashik Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताचे बॅनर शिवसैनिकांनीच फाडले

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

Pratap Sarnaik News : मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताचे बॅनर शिवसैनिकांनीच फाडले

उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली असून फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडण्यात आल्याने येथे खळबळ उडाली आहे. तर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनर वर नसल्याने उमरग्यामध्ये आठ ते दहा ठिकाणी बॅनर फाडण्यात आले आहेत. तर आता बॅनर कोणी फाडले याचा शोध उमरगा पोलीसांकडून घेणं सुरू आहे.

Beed News : वाल्मीक कराड असलेल्या जिल्हा कारागृहात सापडला गांजा

बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कैद्याजवळ 100 ग्रॅम गांजा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सह अन्य आरोपींना याच कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

Manoj Jarange Patil News : "माझे शरीर साथ देत नाही, मी थोड्या दिवसांचा पाहुणा...", मनोज जरांगे पाटील यांचे भावनिक वक्तव्य

मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला आहे. त्यासाठी मुंबईकडे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी एक धक्कादायक वक्तव्य केल्याने राज्यात चिंता वाढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी, सध्या माझे शरीर साथ देत नाही, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. त्यामुळे मला मराठ्यांच्या अंगावर शंभर टक्के गुलाल फेकायचा आहे. परत माघारी येईन की नाही याची खात्री नाही, असं भावनिक वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे.

Sunil Tatkare News : 'भाजप जर एकला चलो चा नारा देणार असेल तर, आमचीही तयारी...' : तटकरेंचा इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खळबळ जनक वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील आपला पराभव हा महाविकास आघाडीच्या नेत्यानंमधील अहंकारामुळेच झाला असल्याचे म्हटलं होते. त्यावर राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे यांनी, ठाकरे यांचे वक्तव्य एकदम बरोबर असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी, आगामी स्थानिकबाबत भाजपला इशारा दिला असून ते जर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असतील तर आमचीही तयार असल्याचे म्हटलं आहे.

'एफडीए'ची वसईत मोठी कारवाई; बारावी पास व्यक्तीनं 85 हजारांची औषधे जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाने वसईमध्ये मोठी कारवाई केली आहे. बारावी पास व्यक्तीनं रुग्णालयाच्या खोलीत परवानगी नसताना औषध दुकान थाटलं होतं. अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकून ८५ हजारांची औषधे जप्त केली. या प्रकरणी अधिक तपास करून संबंधितांवर कोर्टात खटला दाखल करण्यात येईल, असे एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.

'दोन्ही शिवसेना एकत्र...'; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं मोठं विधान

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंडानंतर तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन पक्षांत विभागली गेली आहे. पण आता शिवसेना फुटीची सल ही आपल्या मनाला कायम टोचत असून दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या आशा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे.

मोठी राजकीय घडामोड! प्रकाश आबिटकरांनी अधिवेशन संपताच घेतली खासदार शाहू महाराजांची भेट

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिवेशन आटोपल्यानंतर शनिवारी(ता.19) खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली. या भेटीवर आबिटकर म्हणाले, ही भेट कोणत्याही राजकीय हेतूनं नव्हती, तर त्यांचंही संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट होती. कोल्हापूरच्या प्रश्नांना केंद्रीय अधिवेशनात चांगल्या पद्धतीने बळ द्यावं यासाठी चर्चा झाली.शाहू महाराज हे सर्वांचे मार्गदर्शक आहेत,त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचंही आबिटकर म्हणाले.

महायुती सरकारचा कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठा निर्णय

राज्यातील महायुती सरकारनं कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर आणि तितकाच मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नोडल संस्थांच्या खरेदी केंद्रांवर आता असणार राज्य शासनाचे नियंत्रण असणार आहे. तसेच सरकारनं नाफेड आणि NCCF च्या केंद्रावर दक्षता समिती नेमण्याचा निर्णयही जारी केला आहे.या समितीत महसूल, पणन विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

मोठी बातमी: पुणे शहरातील ओला-उबेर अन् रिक्षाचालकांनी पुकारला बेमुदत संप

पुण्यात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील ओला-उबेर आणि रिक्षाचालकांनी अनिश्चितकाळासाठी संप पुकारला आहे. हा संप मीटरवर भाडे लागू करावे, ई-बाईक टॅक्सी सेवा बंद करावी, अशा मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे. पण याचवेळी नियमबाह्य दर आकारल्यास प्रशासनानं थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

Maharashtra Politics: आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत... शिवसेनाही दुबेंच्या विरोधात मैदानात

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात आता शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे म्हणत राज ठाकरे यांच्या भुमिकेशी आपणही सहमत असल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.

Vaishnavi Hagawane Death Case: महिला व बालहक्क समितीने सादर केला चौकशी अहवाल

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवीन अपडेट आली आहे. वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला व बालहक्क समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालातून ही माहिती समोर आली आहे.ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार असूनया दिशेने पोलिसांनी तपास करावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Nitesh Rane live: राज ठाकरेंना नितेश राणेंनी सुनावलं 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरारोड येथे झालेल्या सभेवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. मीरा रोडची सभा घेण्याऐवजी ही सभा नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. त्याठिकाणी चुकून पण कोणी मराठी बोलत नाही. ते संविधान मानत नाही. नया नगरमध्ये थेट धमकी देतात, मराठी नाही बोलणार. गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देत आहेत, त्यांना मराठी शिकवा, अशा शब्दात नितेश राणे यांनी राज ठाकरेंना सुनावलं.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरांकडे रवाना 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊतांच्या घराकडे रवाना झाले आहे.संजय राऊत यांच्या आईला भेटण्यासाठी ते जात असल्याची माहिती आहे. ही खासगी भेट असल्याचे सांगण्यात आले.

Nitesh Rane live: राज ठाकरेंना नितेश राणेंनी सुनावलं 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरारोड येथे झालेल्या सभेवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. मीरा रोडची सभा घेण्याऐवजी ही सभा नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. त्याठिकाणी चुकून पण कोणी मराठी बोलत नाही. ते संविधान मानत नाही. नया नगरमध्ये थेट धमकी देतात, मराठी नाही बोलणार. गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देत आहेत, त्यांना मराठी शिकवा, अशा शब्दात नितेश राणे यांनी राज ठाकरेंना सुनावलं.

Bacchu Kadu: 24 तारखेला चक्काजाम आंदोलन: बच्चू कडू यांचा इशारा 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते, बच्चू कडू यांनी येत्या 24 तारखेला चक्काजामचा इशारा सरकारला दिला आहे. कर्जमाफी संदर्भात सरकार जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरूच राहणार, असे बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले.

Nashik live: सरोज अहिरे यांच्या मोलकरणीला अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. मोलकरणीने कपाटातून एक लाख रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक रोड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरणीला अटक करण्यात आली आहे.

Pune Shivsena live: 'ही बॅटरी लवकरच संपणार; आदित्य ठाकरेंना डिवचलं 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुण्यात डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्यातील अलका चौक येथे लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांना चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. 'ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही घराणेशाहीवर चालते,'असा मजकूर या बॅनरवर आहे.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey : मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?

निशिकांत दुबे याने 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?' असे ट्विट केले आहे. ट्विट करताना राज ठाकरे जाहीर सभेतून त्यांना उत्तर देत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. राज ठाकरेंना हिंदी शिकवली असे म्हणत दुबे यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Ajit Pawar : अजितदादा आज बारामती दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून त्यांनी बारामतीमधील विविध विकासकामांची पाहणी केली. शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी विकासकामांची पाहणी सुरु केली असून आज ते बारामतीमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

Shivsena UBT Vs BJP : विनायक राऊतांचा मंत्री नारायण राणेंवर हल्लाबोल

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, पण मेरिटवर आपला पराभव झाला नाही. नोट घ्या मतदान करा, असं करत विरोधकांनी 120 कोटी रुपेय वाटले म्हणून ते विजयी झाले. पण आम्ही आर्शिवाद मागितले आणि मतदारांनी चार लाख मते दिली. पुन्हा निवडणुका येतील पुन्हा उभे राहू पुन्हा जिंकू कारण इथला खासदार कोण आहे हे कुणाला माहिती देखील नाही, अशा शब्दात राऊतांनी नारायण राणेंवर टीकास्त्र डागलं.

रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडणार

दौंड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढलेले रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता आहे. लवकरच बैठक घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत थोरात यांना भाजप उमेदवार राहुल कुल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना डिवचले

निशिकांत दुबे याने 'मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ?' असे ट्विट केले आहे. त्याने ट्विट करताना राज ठाकरे जाहीर सभेतून त्याला उत्तर देत असलेल्या व्हिडिओ देखील रिट्विट केला आहे. राज ठाकरेंना हिंदी शिकवली असे म्हणत दुबे यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Uddhav Thackeray Interview : भाजपला इतक्या जागा मिळतील असं त्यांनाही स्वप्नात वाटलं नसेल - उद्धव ठाकरे

सामनाच्या मुलाखतीत भाजपला स्वबळावर इतक्या जागा मिळतील असं तुम्हाला वाटलं होतं का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, मला सोडा पण त्यांनाही स्वप्नात असं कधी वाटलं नसेल. भाजप सोडा, शिंदे गटालाही पन्नासच्या वर जागा मिळाल्या. हा जादूटोणा आहे की काय? यावर बोलताना, कदाचित त्यांनी डायनासोर कापला असेल, असा टोलाहू उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.

Shivsena UBT : निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? - उद्धव ठाकरे

निवडणूक आयुक्तांना शिवसेना हे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकारच नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. संजय राऊतांनी शिवसेना चिन्ह आणि नावा संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले, कदाचित निवडणूक आयोग आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे मात्र, नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.

अधिपरिचारिकांना राज्य सरकारच्या वैद्यकीय संचनालायचा इशारा

परिचरिकांचा राज्यव्यापी संप सुरू असताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने एक पत्र जारी केलं आहे. त्यामध्ये प्रोबेशनवर असलेल्या अधिपरिचारिका संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारच्या वैद्यकीय संचलनालयाने दिला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी आणि इतर मागण्या संदर्भात शासकीय रुग्णालयातील परिचरिकांचा 18 जुलैपासून बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे ज्या प्रोबेशनवर असलेल्या परिचारिका या संपात सहभागी असल्याचे निदर्शनास येणार त्यांची सेवा विना चौकशी समाप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Raj Thackeray Vs BJP : राज ठाकरेंनी तीच री ओढावी, हे दुर्दैवी

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मिरा भाईंदरमधील भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात त्रिभाषासूत्री लागू केल्यास दुकानच नाही तर शाळाही बंद करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवाय भाजचा मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीआधीपासून आहे. आताही भाजपच्या डोक्यात तेच आहे, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, राज यांच्या भाषणावर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही. मात्र, राज ठाकरे तो जाणीवपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी सक्तीची आहे, मात्र हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे, अशी भाषणं काही नेते वर्षानुवर्षे करत असतात. राज ठाकरेंनी तीच री ओढावी, हे दुर्दैवी आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT