बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी राज्यात सतप्त भावना व्यक्त होत आहेत. यावरून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी देखील टीका केली होती. तसेच आपण अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटीची मागणी करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता पिडीतेच्या कुटुंबीयांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून त्यांना निवेदन दिले आहे. या विनेदनात एसआयटी मार्फत प्रकरणाची चौकशी, एसआयटीत आयपीएस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती, पिडीतेचा जबाब नोंदवण्यासाठी वरिष्ठ महिला अधिकारीची नियुक्ती करण्याच्या मागण्या केल्या आहेत.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द केला. याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी मानसाच्या रेट्यामुळेच हे शक्य झाले आणि सरकारला झुकावे लागल्याची टीका केली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्यावर देखील टोला लगावला आहे. त्यांनी, दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर मी काढला नाही. त्यांनी एकत्र यावं किक्रेट खेळावं, जेवणही करावं. आम्हाला काही फरक पडणार नाही, असे म्हटलं आहे.
हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून याबाबत जनमत काय आहे हे तपासून पाहिले. महाराष्ट्र या विरोधात ठामपणे उभा राहिला म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला. अधिवेशनाच्या तोंडावर या माध्यमातून सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशा पद्धतीने महायुतीने प्रयत्न केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्ध सपकाळ यांनी केली आहे.
सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी 13 जागेवर सत्तारांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान रविवार मतदार झाले. तर आज मतमोजणी पार पडली. यावेळी सत्तार यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड आणि सोयगाव कार्यालयासमोर जल्लोष केला.
नुकताच काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशाने भाजपने महाविकास आघाडीसह अजित पवार यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे. पण आता खरा धक्का भाजपला जयश्री पाटील यांनी दिला आहे. महायुतीत जागा वाटपाचा अद्याप फॉर्म्युला ठरलेला नसतानाच त्यांनी 50 टक्के जागांवर दावा केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील खदखद जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीवरून बाहेर येत आहे. रविकिरण इंगवले निवड झाल्याने अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यात आदित्य ठाकरे यांच्या टीकेनं देखील यात तेल ओतण्याचे काम केलं आहे. आता दक्षिण शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा देत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर आणखी एक धक्का उद्धव ठाकरेंना बसणार आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार हे शिंदेंच्या सेनेत दाखल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. तर ते उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मदतीने शिवसेनेत जातील अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
Raj thackeray uddhav thackeray rally News : राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं ठिकाणं ठरलं; मुंबईच्या विजयी मेळाव्याचा एल्गार!
हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या विरोधात दंड थोपाटले होते. तर 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचे नियोजनही झाले होते. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हिंदी सक्तीचे दोन्ही निर्णय रद्द केले. यानंतर 5 जुलैचा मोर्चा होणार की नाही, यावरून आधीच स्पष्टीकरण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिले आहे. आता येत्या 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा मुंबईत एकत्र विजयी मेळावा होणार आहे. यासाठी मुंबईतील दादरचे शिवाजी पार्क निश्चत होण्याची शक्यता आहे. येथेच शिवसेनेची स्थापना आणि 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे पहिले भाषण झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.